देश

#ElectionCommission लोकसभेचे बिगूल अखेर वाजले; 11 एप्रिल ते 19 मेदरम्यान मतदान, 23 मेला निकाल

वृत्तसंस्था

Loksabha 2019 : नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुका केव्हा जाहीर होणार याकडे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशातील जनतेचे लक्ष लागले होते. मात्र, आता या निवडणुकीचे बिगूल अखेर वाजले. देशभरात सात टप्प्यांत मतदान घेतले जाणार आहे. 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान मतदान होणार असून, या निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू केली जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (रविवार) दिली. असेही ते म्हणाले.

विज्ञान भवन येथे पहिल्यांदाच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. यावेळी आयोगाने या सर्व बाबींची माहिती दिली. लोकसभेच्या 543 जागांसाठी निवडणूक होणार आहे. अरोरा म्हणाले, राजकीय पक्षांची चर्चा झाली आहे. देशातील मतदारांची संख्या सुमारे 90 कोटींपर्यंत आता गेली आहे. दीड कोटी नोकरदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. विविध राज्यांतील परीक्षांचाही मतदानाच्या तारखा नियोजित करण्यापूर्वी विचार करण्यात आला. 2014 पेक्षा 7 कोटी मतदार वाढले. लोकसभेसाठी 10 लाख मतदान केंद्र असणार आहेत. ईव्हीएमवर उमेदवारांचा फोटोही असणार आहे. आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली असून, याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही अरोरा म्हणाले.

तसेच आचारसंहिता भंग झाल्यास त्याची तक्रार मोबाईलवरूनही करता येणार आहे. ईव्हीएमवर जीपीएसच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. 'पेड न्यूज'वर कारवाई कडक कारवाई केली जाईल.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या तारखांबाबत जोरदार चर्चा सुरू होती. या निवडणुकांची घोषणा 8 मार्चलाच होईल, असा अंदाज बांधण्यात येत होता. मात्र, आज अखेर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान ही माहिती देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT