Gujarat Loksabha Election esakal
देश

Gujarat Loksabha Election : गुजरातमध्येच भाजपला धक्का, एकाच दिवसात दोन उमेदवारांची निवडणुकीतून माघार

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमध्ये एकाच दिवसामध्ये दोन उमेदवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी गुजरातच्या वडोदरा मतदारसंघाच्या खासदार आणि भाजप उमेदवार रंजन भट्ट यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.

संतोष कानडे

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमध्ये एकाच दिवसामध्ये दोन उमेदवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी गुजरातच्या वडोदरा मतदारसंघाच्या खासदार आणि भाजप उमेदवार रंजन भट्ट यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. आता गुजरातच्या साबरकांठा येथून भाजप उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपने साबरकांठा लोकसभा मतदारसंघातून भीकाजी ठाकोर यांना लोकसभेसाठी तिकिट जाहीर केलं होतं. त्यांनी आता निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वीच वडोदरा येथून रंजनबेन भट्ट यांनी निवडणूक न लढवण्याचं जाहीर केलं. त्यांनी एक्सवर पोस्ट लिहीत, ''मी रंजनबेन धनंजय भट्ट. काही खासगी कारणास्तव लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाही.'' असं म्हटलं. त्यानंतर काहीच वेळात साबरकांठा येथील भाजप उमेदवार भीकाजी ठाकोर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर निवडणूक न लढवण्याची घोषणा केली.

''मी भीकाजी ठाकोर. काही खासगी कारणांमुळे मी साबरकांठा येथून लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाही'' अशी पोस्ट ठाकोर यांनी इन्स्टाग्रामवर केली. भट्ट यांना वडोदरा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा उमेदवारी देणाऱ्या भाजपविरोधात बॅनरबाजी झाली होती. त्यानंतर त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी भट्ट यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. वडोदरा येथून तिसऱ्यांदा भट्ट यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजप महिला सेलच्या उपाध्यक्ष ज्योतीबेन पंड्या यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये वडोदराची जागा सोडल्यानंतर भट्ट यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही भट्ट विजयी झाले होते आणि आगामी निवडणुकीसाठी त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती.

गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा आहेत. ७ मे रोजी एकाच टप्प्यात गुजरातमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यापूर्वी २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने लोकसभेच्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jio IPO Listing: जिओच्या शेअरची बाजारात धडाक्यात एंट्री! 21.36% प्रीमियमवर लिस्टिंग; गुंतवणूकदारांना किती फायदा?

Priyanshu Moliya Triple Century : ३७ चेंडूंत १५० धावा... भारताच्या २१ वर्षीय फलंदाजाचे त्रिशतक, ६९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; चेतेश्वर पुजाराच्या पंक्तीत जाऊन बसला

मुंबई-अहमदाबाद मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा; पुर्णेकर समर्थकांच्या आंदोलनाचा फटका

LPG Gas Price Today: दिवाळीपूर्वी गॅस सिलिंडर महागला की स्वस्त? मुंबई-पुणे-नागपूरसह महाराष्ट्रातील शहरांचे दर पाहा

IND vs NZ 4th T20I : अभिषेक-वैभवची फटकेबाजी अन् चौथ्या मॅचची तिकीटं Sold OUT! पण हा सामना तुम्हाला Free पाहण्याची संधी; कधी, कुठे व केव्हा?

SCROLL FOR NEXT