Amit Shah  Sakal
देश

Loksabha election : अमित शाह मणिपूरमध्ये; ''घुसखोरी करुन सामाजिक व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न...'' नेमकं काय म्हणाले?

सर्व समुदायांना विश्‍वासात घेऊन आणि राज्याचे तुकडे होऊ न देता मणिपूरमध्ये शांतता कायम राखणे, यालाच मोदी सरकारचे प्राधान्य आहे. आमचे मुख्यमंत्री बीरेन सिंह हे मोदींकडे कायम मागणी करत असतात. आंतरसीमा परवाना असल्याशिवाय मणिपूर एकसंध राहू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हा परवाना देऊन भाजपने मणिपूरला ताकद दिली आहे.’’

सकाळ वृत्तसेवा

इंफाळ : ‘‘मणिपूरमध्ये घुसखोरी करून येथील सामाजिक व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही. ही लढाई तुकडे करणारे विरुद्ध एकत्र ठेवणारे यांच्यातील आहे,’’ असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज मणिपूर येथे केला.

मणिपूरमधील वांशिक हिंसाचारावरून विरोधी पक्ष भाजपवर टीका करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची सोमवारी येथे सभा झाली. मणिपूरमध्ये शांतता कायम ठेवण्याचा निश्‍चय व्यक्त करताना शहा म्हणाले,‘‘मणिपूरमध्ये घुसखोरीचे अनेक प्रयत्न होत आहेत. याद्वारे येथील सामाजिक रचना बदलण्याचा डाव आहे. मात्र अशा लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही.

सर्व समुदायांना विश्‍वासात घेऊन आणि राज्याचे तुकडे होऊ न देता मणिपूरमध्ये शांतता कायम राखणे, यालाच मोदी सरकारचे प्राधान्य आहे. आमचे मुख्यमंत्री बीरेन सिंह हे मोदींकडे कायम मागणी करत असतात. आंतरसीमा परवाना असल्याशिवाय मणिपूर एकसंध राहू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हा परवाना देऊन भाजपने मणिपूरला ताकद दिली आहे.’’

मणिपूरमध्ये मागील वर्षी झालेल्या वांशिक संघर्षावरही अमित शहा यांनी भाष्य केले. ते म्हणाले,‘‘ईशान्य भारताचे नशीब बदलेल तेव्हाच भारताचे नशीब बदलेल. मी संघर्षाबद्दल संसदेतही बोललो आहे. हा संघर्ष मिटविण्यासाठी आम्ही हरप्रकारे प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांचाच परिणाम म्हणून परिस्थितीत सुधारणा होत आहे.’’

सर्व देश आणि संसदही तुमच्यासोबत आहे, याची ग्वाही मी मणिपूरला देतो. येथील प्रत्येक आव्हानावर आपण मिळून तोडगा काढू

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT