Trinamool Congress workers celebration sakal
देश

National Politics : राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक नेत्यांचे महत्त्व वाढले

‘चारशे पार’ चा नारा दिलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीत स्वबळावर स्थापन करण्याइतपत २७२ जागा देखील जिंकता आल्या नाहीत.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - ‘चारशे पार’ चा नारा दिलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीत स्वबळावर स्थापन करण्याइतपत २७२ जागा देखील जिंकता आल्या नाहीत. एकप्रकारे भाजपच्या तमाम नेत्या-कार्यकर्त्यांसाठी हा निकाल धक्कादायक असाच आहेत. आंध्र मधील तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते चंद्राबाबू नायडू आणि बिहारमधील संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांच्यासह भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (भाजप) तमाम छोट्या पक्षांवरील भाजपची भिस्त यामुळे वाढणार आहे.

केंद्रात तिसऱ्यांदा ‘एनडीए’चे सरकार बनले तरी हे सरकार चालविणे भाजपसाठी तितके सोपे राहणार नाही. घटक पक्षांची मर्जी सांभाळणे भाजपसाठी जास्त महत्त्वाचे ठरेल. तिसऱ्यांदा सरकार बनले तर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडील काळात सांगितले होते. असे निर्णय घेण्यासाठी घटक पक्षांची संमती घेणे भाजपसाठी आवश्यक ठरेल, हेही लक्षात घेण्यासारखे आहे. विशेषत: चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे राष्ट्रीय राजकारणातले महत्त्व पुन्हा वाढेल.

बहुमताचा आकडा गाठण्यासाठी भाजपला तीसपेक्षा जास्त जागांची गरज आहे. अशा स्थितीत टीडीपी, संयुक्त जनता दल, शिवसेना आणि लोकजनशक्ती पक्षाचे महत्त्व वाढेल. दुसरीकडे जनसेना, ‘आरएलडी’ अशा पक्षांना सोबत ठेवण्यासाठी भाजपला महत्प्रयास करावे लागतील. एनडीएचे सरकार बनले तर नायडू, नितीश कुमारांसह एकनाथ शिंदे आणि चिराग पासवान या नेत्यांचे राष्ट्रीय राजकारणातले महत्त्व वाढेल.

‘इंडिया’ला सरकार बनविणे सोपे नाही

‘इंडिया’ आघाडीसाठी सरकार बनविणे तितके सोपे नाही. नायडू-कुमार जोडीने पाठिंबा देण्याचे ठरवले तरी १५ ते २० जागा इंडिया आघाडीला कमी पडतात. अशावेळी कोणत्याही आघाडीत सामील नसलेल्या तसेच अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांचे महत्त्व वाढेल.

‘इंडिया’ आघाडीतील तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी तसेच सपच्या अखिलेश यादव यांची भूमिका भविष्यात काय असेल, हेही महत्त्वाचे ठरू शकते. विशेषत: सरकार बनण्याची स्थिती आली तर हे दोन्ही नेते पंतप्रधान पदावर दावा ठोकू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Solapur Accident : तुळजापुरला जाताना काळाचा घाला, कोल्हापूर–सोलापूर रस्त्यावर भीषण अपघातात कसबा बावड्यातील दाम्पत्य ठार

फक्त 10,999 मध्ये खरेदी करा 50MP सेल्फी कॅमेरा; AI फीचर्स, iPhone सारखा जबरदस्त मोबाईल, 31 मार्चपर्यंत 14 हजारचा डिस्काउंट

Latest Marathi News Live Update : बच्चू कडू यांनी भोंदू बाबा अशोक खरातची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल

Jalgaon Crime : चॉपर हल्ल्यातील जखमी तरुणाचा अखेर मृत्यू; 500 रुपये न दिल्याने पोटात केले होते वार, दहा तास मृत्यूशी झुंज अयशस्वी

LPG Gas : गॅस तुटवड्यात काळाबाजार तेजीत; कोल्हापुरात घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर उघड

SCROLL FOR NEXT