Exit Poll vs Opinion Poll Esakal
देश

Exit Poll: एक्झिट पोल अन् ओपिनियन पोल मध्ये काय आहे फरक? तुमचाही होतो गोंधळ? जाणून घ्या सर्वकाही

Opinion Poll: एरिक डी'कोस्टा यांनी भारतात एक्झिट पोल सुरू केले होते. भारतात 1998 मध्ये पहिल्यांदा एक्झिट पोल टीव्हीवर प्रसारित करण्यात आले.

आशुतोष मसगौंडे

देशातील लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. सात टप्प्यात पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यांतील जागांवर 1 जून रोजी मतदान होणार आहे. तर चार जून रोजी मतमोजणीसह निकाल लागणार आहेत.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात यंदा काय निकाल लागेल याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच अनेकजन निकालापूर्वी एक्सिट पोलची वाट पाहत आहे. शेवटच्या टप्प्यातील जागांवर 1 जून रोजी सायंकाळी मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर आपल्याला एक्सिट पोल पाहायला मिळणार आहेत. यातून कोणत्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील आणि कोणता पक्ष सत्ता मिळवले याचा अंदाज येणार आहे. (Loksabha Election 2024)

एक्झिट पोल म्हणजे काय?

वास्तविक, एक्झिट पोल हा एक प्रकारचा निवडणूक सर्वे असतो. मतदानाच्या दिवशी मतदार मतदान करून मतदान केंद्राबाहेर पडतो तेव्हा विविध सर्वेक्षण संस्था आणि वृत्तवाहिन्यांचे लोक तिथे उपस्थित असतात. ते मतदाराला मतदानाबाबत प्रश्न विचारतात.

यामध्ये त्यांना विचारण्यात येते की त्यांनी कोणाला मतदान केले? अशा प्रकारे प्रत्येक मतदान केंद्रांवरून मतदारांना प्रश्न विचारले जातात. मतदान संपेपर्यंत अशा प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात डेटा गोळा केला जातो. ही आकडेवारी गोळा करून त्यांच्या उत्तरांनुसार जनतेचा मूड कोणता आहे याचा अंदाज येतो? गणिताच्या आधारे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मोजले जाते? मतदान संपल्यानंतरच त्याचे प्रसारण केले जाते.

किती लोकांना मतदारांना विचारले जातात प्रश्न?

एक्झिट पोल काढण्यासाठी सर्वे एजन्सीचा किंवा वृत्तवाहिनीचा रिपोर्टर अचानक एखाद्या बूथवर जातो आणि तिथल्या लोकांशी बोलतो. तो कोणाला विचारणार हे आधीच ठरलेले नसते. साधारणपणे, अचूक एक्झिट पोलसाठी, 30-35 हजार ते एक लाख मतदारांचे मत घेतले जाते. यामध्ये प्रदेशनिहाय प्रत्येक विभागातील मतदारांचा समावेश करण्यात येतो.

ओपिनियन पोल आणि एक्झिट पोलमधील फरक

ओपिनियन पोल: ओपिनियन पोल मतदानाच्या आधी केला जातो. यामध्ये सर्व लोकांना ओपिनियन पोलमध्ये समाविष्ट केले जाते, मग ते मतदार असोत किंवा नसोत. यातून मतदार, सर्वसामान्य जनतेचा राग कशावर आहे आणि ते कशावर समाधानी आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.

एक्झिट पोल: मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल घेतला जातो. एक्झिट पोलमध्ये फक्त मतदारांचा समावेश केला जातो. यातून लोकांनी कोणत्या पक्षावर विश्वास व्यक्त केला हे समजून घेता येते.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन (IIPU) चे प्रमुख एरिक डी'कोस्टा यांनी भारतात एक्झिट पोल सुरू केले होते. भारतात 1998 मध्ये पहिल्यांदा एक्झिट पोल टीव्हीवर प्रसारित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SCROLL FOR NEXT