Loksabha Election Laxman Savadi esakal
देश

'कोणी कितीही प्रयत्न केले, तरी मी भाजपमध्ये जाणार नाही'; माजी उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

आपण काँग्रेस (Congress) पक्ष सोडणार नाही, भाजपमध्ये जाणार नाही, हे स्पष्ट आहे.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेस पक्षामध्ये मला मानपान व स्थान आहे. यापूर्वी भाजप सोडून जात असताना नेत्यांनी माझा विचार केला नाही. आताच त्यांना का पुळका आला.

अथणी : आपण काँग्रेस (Congress) पक्ष सोडणार नाही, भाजपमध्ये जाणार नाही, हे स्पष्ट आहे. याशिवाय लोकसभेच्या निवडणुकीसाठी (Loksabha Election) रिंगणात उतरत नाही. काँग्रेसमध्ये योग्य महत्त्व असल्याने पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. कोणी कितीही प्रयत्न केले तरी मी भाजपमध्ये (BJP) जाणार नाही, असे माजी उपमुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सवदी (Laxman Savadi) यांनी सांगितले.

यंकची (ता. अथणी) येथे पत्रकारांशी ते बोलत होते. आमदार सवदी म्हणाले, कोण पक्ष सोडून कुठे गेले, त्याचा विचार न करता मी मात्र काँग्रेसमध्येच राहणार आहे. काँग्रेस पक्षामध्ये मला मानपान व स्थान आहे. यापूर्वी भाजप सोडून जात असताना नेत्यांनी माझा विचार केला नाही. आताच त्यांना का पुळका आला. कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्ष सोडणार नसून मोडेन पण वाकणार नाही.

आपल्या तालुक्यातील पाणीपुरवठा योजना असलेल्या कोटलगी योजनेचा प्रारंभ गोकाकमध्ये का केला? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले, या कामाचा प्रारंभ कामाच्या ठिकाणी व्हायला हवा होता. माजी आमदारांच्या बोलण्यात कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah), पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी अनुदान दिले असून त्यांच्या हस्ते लवकरच कामाचा प्रारंभ करण्यात येईल. काँग्रेस सरकारने अनुदान दिले असून त्यांच्या हस्तेच कामाचा प्रारंभ करून परिसरात पाण्याची गंगा वाहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT