Masjid Loud Speaker Controversy
Masjid Loud Speaker Controversy Sakal
देश

भोंगे आणि आवाजाबद्दल कायदा काय सांगतो माहितीये का?

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे यांनी आपल्या उत्तर सभेमध्ये मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला आणि देशभरात राजकारण पेटलं. मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर मंदिरावर भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी काही मुस्लीम बांधवांकडून विरोध केला गेला. भोंगे आणि आवाज यासंदर्भात कायदा काय सांगतो आणि भोंग्यासंदर्भात काय तरतूदी आहेत हे आपल्याला माहिती आहे का? तर भोंग्यासंदर्भात कायदा काय सांगतो हे आपण पाहणार आहोत.

काय आहे ध्वनी प्रदूषण कायदा - 2000?

  • सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यासाठी लिखीत परवानगीची गरज

  • रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत लाउडस्पीकरवर बंदी

  • बंद घरात आणि बंद ठिकाणी रात्री लाउडस्पीकर वाजवू शकतो

  • विशेष कार्यक्रमासाठी राज्य सरकार रात्री १२ वाजेपर्यंत लाउडस्पीकर वाजवण्याची परवानगी देऊ शकते. त्यासाठीही लेखी पूर्वपरवानगी आवश्यक

  • सरकारचे हॉस्पिटल, शाळा, महाविद्यालये, व्यवसायिक संस्था यांच्या आसपास शांतता क्षेत्र बनवू शकतो

  • शांतता क्षेत्राच्या १०० मीटर जवळपास लाउडस्पीकर वाजवण्यास बंदी

कुठे किती आवाजाची क्षमता?

  • निवासी क्षेत्र - सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ५५ डेसीबल

  • निवासी क्षेत्र - रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ४५ डेसीबल

  • व्यवसायिक क्षेत्र - सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ६५ डेसीबल

  • व्यवसायिक क्षेत्र - रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ५५ डेसीबल

  • शांतता क्षेत्र - सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत ५० डेसीबल

  • शांतता क्षेत्र - रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ४० डेसीबल

कुठून सुरु झाला भोंग्याचा हा वाद?

महाराष्ट्रातील स्थानिक पक्ष महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला मोठी सभा घेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले होते. खूप लोकांनी त्यांच्या भोंग्याच्या या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी राज यांनी उत्तर सभा आयोजित केली होती. त्यांची ही उत्तर सभा १२ एप्रिलला पार पडली.

त्यावेळीही राज ठाकरे त्यांच्या भोंग्याच्या वक्तव्यावर ठाम राहत ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी अल्टिमेटम दिला होता. जर मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालीसा लावू असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर हा वाद देशभर पसरला असून उत्तरप्रदेशमधील वाराणसीमध्ये मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसाचं पठन करण्यात आलं आहे. त्यामुळे हा वाद जास्तच पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT