लवजिहाद
लवजिहाद sakal
देश

Crime News : लवजिहाद! ओळख बदलून केली तरुणीची फसवणूक, टाकला धर्मांतर करण्यासाठी दबाव! तरुणीने सांगितली फसवणुकीची आप बीती..

सकाळ वृत्तसेवा

यूपीच्या उन्नवमधील मोरवा येथे राहणारी एक मुलगी नोएडामधील एका कंपनीत काम करत होती. चार वर्षा पूर्वी तिला उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यातील एका तरुणांने आपली ओळख बदलून प्रेमात फसवले. त्यानंतर तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून फोटो व व्हिडिओ रेकॉर्डिंग केला. तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून हळूहळू सहा लाख रुपये लंपास केले. तरुणीने त्याला लग्नाचे विचारल्यावर त्याने तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. तो तरुणीला जीव मारण्याची धमकी देऊन लागला.

धर्मांतर बद्दल ऐकून मुलीला आश्चर्य वाटले तिच्यासोबत झालेली फसवणूक तिच्या लक्षात येताचय तिने मुलाबद्दल संभल येथे जाऊन चौकशी केली. तेव्हा तिच्या लक्षात आले की, या तरुणाचे नाव अनुराग नसून जैद अली आहे. तो संभलच्या चंदौसी तालुक्यामधील बनियाठेर पोलीस स्टेशन हद्दीमधील नरौली गावाचा रहिवासी आहे. तरुणीने नरौली पोलीस चौकीत जाऊन या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच हिंदूत्ववादी संघटनेचे लोक नरौली पोलीस चौकीत पोहोचले

त्यावेळी तेथे सीओ डॉ. प्रदीप सिंह आणि बनियाठेर पोलीस स्टेशनचे अधिकारी आले होते. हिंदूत्ववादी संघटनेच्या लोकांनी लवजिहाद या प्रकरणा खाली कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई होत नसल्याचे पाहून ते पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. या गोंधळाची माहिती अप्पर पोलीस अधिकारी श्रीचंद्र यांना मिळताच ते चौकीत पोहोचले, त्यांनी कारवाईचे आश्वासन देऊन गोंधळ शांत केला.

तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल

रात्री उशिरा या मुलीच्या तक्रारीवरून बनियाठेर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध लवजिहादचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी विरुद्ध गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT