love jihad Case esakal
देश

Love Jihad : आमच्याशी लग्न करून मुस्लिम व्हा, नाहीतर तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही; हिंदू मुलींना धमकी

इंदूर जिल्ह्यात 'लव्ह जिहाद'चं एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय.

सकाळ डिजिटल टीम

आरोपींनी हिंदू मुलींना धमकावत आमच्याशी लग्न करून मुस्लीम व्हा, अन्यथा समाजात तोंड दाखवू शकणार नाही, अशी धमकी दिली.

Love Jihad In Indore : इंदूर जिल्ह्यात 'लव्ह जिहाद'चं एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. महू पोलिसांनी दोन मुस्लिम तरुणांविरुद्ध अश्लील कृत्य आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय.

आरोपींनी हिंदू मुलींना धमकावत आमच्याशी लग्न करून मुस्लीम व्हा, अन्यथा समाजात तोंड दाखवू शकणार नाही, अशी धमकी दिली. ही घटना महू पोलीस ठाण्याच्या (Mahu Police Station) हद्दीतील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही पीडित मुली 16 वर्षांच्या आहेत. ही घटना महू इथं घडलीये. वाहिद आणि अमन अशी आरोपींची नावं आहेत. आरोपी आपल्यासोबत अश्लील कृत्य करत असल्याचं मुलींनी पोलिसांना सांगितलं. आम्हाला त्यांच्याशी लग्न करण्यास सांगत आहेत. लग्नास नकार दिल्यावर आरोपींनी हिंदू समाजात तुमची किंमत नसल्याचं सांगितलं.

आमच्याशी लग्न करा आणि धर्मांतर करून मुस्लिम व्हा, असंही आरोपी म्हणाल्याचं पीडित मुलींनी सांगितलं. वाहिदनं एका मुलीला घट्ट पकडून ठेवलं होतं. आणि तिला धमकावून सांगितलं की, तू ऐकली नाहीस तर समाजात तोंड दाखवू शकणार नाहीस, अशी धमकी दिली. टीआय महेंद्रसिंग भदोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT