lover said married girlfriend marry me at shivpuri 
देश

मला समजून घे; आता माझं लग्न झालंय...

वृत्तसंस्था

शिवपूरी (मध्य प्रदेश): मला समजून घे, आता मांझ लग्न झाले असून मला मुलगा आहे. पण, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर त्याने दोघांवर चाकूने हल्ला केला. यामध्ये अकरा महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला तर महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झलकुई गावामध्ये राहात असलेल्या चोवीस वर्षीय महिलेचा विवाह झाला होता. विवाहापूर्वी महिला व अशोक आदिवासी (वय 25) चे प्रेमसंबंध होते. दोन वर्षानंतर महिला अकरा महिन्यांच्या मुलासह माहेरी आली होती. शेतामध्ये मुलाला सोबत घेऊन काम करत होती. यावेळी अशोक आला आणि माझ्यासोबत विवाह कर म्हणून पाठीमागे लागला. तिने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आपल्याशी विवाह करत नाही म्हटल्यावर त्याने चाकूने दोघांवर हल्ला केला. याघटनेत मुलाचा मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली आहे. अशोकला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, अशोकने चिमुकल्यावर चाकू हल्ला केल्यानंतर महिला त्याला अडवत होती पण त्याने महिलेवरही चाकूने वार केले. शिवाय, त्याने स्वतःवरही वार करून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians: रोहित शर्मा पुन्हा कर्णधार, पण बुमराहचा उपकर्णधारपदाला नकार का? चर्चांना उधाण

US Air Force Cyber Attack: अमेरिकेत मोठा सायबर हल्ला; हवाई दलाच्या क्लाउड यंत्रणेत हॅकर्सच्या घुसखोरीने खळबळ

Mirzapur Fame Brahma Mishra : ज्याने संपूर्ण देशाला खळखळून हसवलं, त्याचा शेवट मात्र अत्यंत वेदनादायी! घरात एकटे असताना नेमकं काय घडलं? 'मिर्झापूर'मधील 'ललित'च्या मृत्यूची हादरवणारी कहाणी!

Delimitation Bill : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'डिलिमिटेशन'ला पाठिंबा? जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?

Delimitation Bill: 'मतदारसंघ पुनर्रचनेला काँग्रेसचा विरोध नाही, पण...' पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितला नेमका कळीचा मुद्दा?

SCROLL FOR NEXT