Lovers death in beating Lovers death in beating
देश

प्रेयसीच्या फोन आला अन् जाळ्यात अडकला प्रियकर; घरी बोलावून...

सकाळ डिजिटल टीम

युवकाचा फोन वाजला... बघितले असता प्रेयसीचा फोन होता... आनंदाने त्याने फोन उचलला... फोनवर प्रेयसीने घरी भेटायला बोलावले... प्रेयसीच्या एका बोलावण्यावर तो घरून निघाला... मात्र, त्याच्यासाठी हा शेवटचा प्रवास ठरला... कारण, प्रेयसीच्या कुटुंबीयांनी त्याला सापळ्यात अडकवण्यासाठी हा प्लान तयार केला होता... यातच त्याचा मृत्यू झाला... ही घटना बिहारच्या सारण जिल्ह्यातील पानापूर पोलिस ठाण्याअंतर्गत घडली... राजेंद्रकुमार राम (१९) असे मृत (Lovers death in beating) प्रियकराचे नाव आहे. (Lovers death in beating)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पानापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सेमरी गावातील रहिवासी उमेश राम यांचा १९ वर्षीय मुलगा राजेंद्रकुमार राम याचे गावातीलच एका मुलीशी प्रेमसंबंध (love affair) होते. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रेमाची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना लागली. यामुळे ते चिडले. प्रथम त्यांनी मुलीला मारहाण करून केली. नंतर मुलीवर दबाव टाकत प्रियकराला घरी बोलवण्यास सांगितले.

कुटुंबीयांच्या भीतीपोटी मुलीने प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलावले. प्रेयसीचा फोन आल्याने राजेंद्रकुमार तिच्या घरी जाण्यासाठी निघाला. मात्र, आपण मृत्यूच्या जवळ जात आहे राजेंद्रकुमारला माहीत नव्हते. प्रेयसीच्या घरी पोहोचताच तरुणाला कोंडून लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण (Beating) करण्यात आली. यात तो गंभीर जखमी केले.

राजेंद्रकुमारच्या कुटुंबीयांच्या याची माहिती मिळताच मुलाला उपचारासाठी स्थानिक आरोग्य केंद्रात दाखल केले. इथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सदर हॉस्पिटल छपरा आणि नंतर पाटणा येथे पाठवण्यात आले. मात्र, पाटणा येथे उपचारादरम्यान गुरुवारी राजेंद्रकुमारचा मृत्यू झाला. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे.

कुटुंबीयांनी रचलेल्या सापळ्यात अडकला

मुलीचे राजेंद्रकुमारशी प्रेमसंबंध (love affair) असल्याची माहिती मिळताच कुटुंबीय चांगलेच चिडले होते. त्यांनी मुलीला युवकापासून दूर राहण्यास सांगितले. मात्र, मुलगी तयार नव्हती. यामुळे कुटुंबीयांनी तिला जबर मारहाण (Beating) केली. तसेच राजेंद्रकुमार घरी बोलावण्यास बाध्य केले. कुटुंबीयांनी रचलेल्या सापळ्याची मुलीला कल्पनाही नव्हती. यामुळे तिने प्रियकराला घरी बोलावले. कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर गोळीबारचा थरार, तरूणाने स्वत:वरच गोळी झाडून घेतली

Beed News: दुष्काळी मातीत फुलला रेशमी स्वप्नांचा मळा; बीडचा पॅटर्न देशभर हिट; उत्तराखंड, झारखंड आणि कर्नाटकपर्यंत तुती रोपांचा पुरवठा

SCROLL FOR NEXT