देश

खुशखबर! गॅस सिलेंडर झाला स्वस्त; तब्बल...

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्वचजण सध्या चिंतेत आहेत. पण आता या सर्व नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार, गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही कपात एक एप्रिल म्हणजे आजपासून लागू करण्यात येत आहे. गॅस दरामध्ये कपात केल्याने सर्वसामान्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. 

सध्या गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे. तसेच कोरोना व्हायरसचे असलेले संकट या सर्व बाबींमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. त्यानंतर आता सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

सिलेंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये विनाअनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलेंडर जवळपास 62 रुपयांनी स्वस्त झाला आहे. 

मार्चमध्येही गॅस सिलेंडरचे दर कमी

यापूर्वी एक मार्चला गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. त्यानंतर आता विनाअनुदानित गॅस सिलेंडरचे दर तब्बल ६२ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. 1 एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT