Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime News esakal
देश

योगींच्या शपथविधीपूर्वीच लखनऊमध्ये चकमक; दरोडेखोर ठार

सकाळ डिजिटल टीम

अलीगंजमधील एका ज्वेलरी दुकानावर राहुलनं दरोडा टाकला होता.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या शपथविधीच्या काही तास आधी राजधानी लखनऊमध्ये एका बदमाशाची हत्या करण्यात आलीय. राहुल सिंह असं या बदमाशाचं नाव असून लखनऊ (Lucknow) पोलिसांनी हसनगंज भागातील चकमकीत त्याला ठार केलंय. राहुल सिंहवर अलीगंज ज्वेलर्स (Aliganj Jewelers) दरोडा प्रकरणाचा आरोप होता. या दरोड्यात त्यानं एका कर्मचाऱ्याची हत्या केली होती.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एक लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या राहुल सिंहला लखनऊ पोलिसांनी (Lucknow Police) शुक्रवारी पहाटे 4 वाजता हसनगंज परिसरात घेरलं. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. अलीगंज पोलीस स्टेशन हद्दीतील बंधा रोडवर झालेल्या चकमकीत राहुल सिंह जखमी झाला. त्यानंतर त्याला ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं त्याचा मृत्यू झालाय.

Uttar Pradesh Crime News

राहुल सिंह गेल्या वर्षी अलीगंजमधील एका ज्वेलरी दुकानावर दरोडा टाकला होता. राहुलकडून ज्वेलरी शोरूममधून लुटलेलं दागिनंही जप्त करण्यात आलंय. यासोबतच त्याच्याकडून पोलिसांना पिस्तूल आणि अनेक जिवंत काडतुसं सापडली आहेत. सध्या राहुल सिंहचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय. दरम्यान, उत्तर प्रदेशात योगी सरकार (Yogi Government) परतल्यानंतर गुन्हेगारांवर कारवाई सुरू झालीय. राहुल सिंह हा दुसरा बदमाश आहे, जो योगी सरकार 2.0 असताना मारला गेलाय. यापूर्वी वाराणसीत 2 लाखांचं बक्षीस असलेला गुन्हेगार मनीष सिंह उर्फ ​​सोनू सिंह यालाही पोलिसांनी मारलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT