Shafiqur Rahman Barq esakal
देश

ज्ञानवापी मशिदीत 'शिवलिंग' नाहीच; सपा खासदारानं सांगितलं 'हे' कारण

सकाळ डिजिटल टीम

'इतिहासात खोलवर गेल्यास ज्ञानवापी मशिदीत 'शिवलिंग' नव्हतं हे कळेल.'

लखनौ : संभलचे (Uttar Pradesh) समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांनी रविवारी वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत (Gyanvapi Masjid) 'शिवलिंग' नसल्याचा दावा केलाय. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) अनुषंगानं ही परिस्थिती निर्माण केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्याचबरोबर अयोध्येत राम मंदिर बांधलं जात असलं तरी तिथं मशीद आहे, असंही बर्क म्हणाले.

सपा खासदार (SP MP) बर्क यांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर ज्ञानवापी मशिदीशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात पत्रकारांना सांगितलं की, 2024 च्या निवडणुका लक्षात घेऊन ही परिस्थिती निर्माण केली जात आहे. इतिहासात खोलवर गेल्यास ज्ञानवापी मशिदीत 'शिवलिंग' नव्हतं हे कळेल. हे सर्व चुकीचं आहे, असं त्यांनी नमूद केलंय.

ज्ञानवापी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे 3 पर्याय

ज्ञानवापी मशीद प्रकरणाची (Gyanvapi Masjid case) सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) ज्ञानवापीचा खटला हस्तांतरित करण्यात आलाय. हे प्रकरण प्रथम जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायाधीश करणार आहेत. तर सुप्रीम कोर्टाने ज्ञानवापी मशीद प्रकरणी तीन पर्याय ठेवले आहेत. वाराणसी कोर्टाला सुनावणी पूर्ण करु द्या, सुनावणीपर्यंत कोर्ट अंतिम आदेश देऊ शकतं तसेच निर्णय येईपर्यंत अंतरिम आदेश लागू असेल, असे तीन पर्याय सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.

ज्ञानवापी मशिदीच्या सुनावणीतील मुद्दे

  • ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणाची ३ न्यायाधीशांच्या बेंचकडून सुनावणी

  • ज्ञानवापी मशिदीप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून ३ पर्याय

  • वाराणसी कोर्टाला सुनावणी पूर्ण करु द्या-पहिला पर्याय

  • सुनावणीपर्यंत कोर्ट अंतिम आदेश देऊ शकतं-दुसरा पर्याय

  • निर्णय येईपर्यंत अंतरिम आदेश लागू असेल-तिसरा पर्याय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained : शिंदेंना ठाकरेंचे खासदार फोडण्याची गरज का भासली? पडद्यामागे नेमकं काय शिजतंय? थेट मुद्दा समजून घ्या...

Prithviraj Chavan: सहकाराचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी: पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा कारखान्यात परिवर्तनाची हाक, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

Kolhapur Wrestler Death : भिंतीवर खुरपे मारताना विजेच्या तारेला हात लागला अन्; १३ वर्षीय पैलवानाबाबत घडली हृदयद्रावक घटना

Who is Yoane Wissa? रोनाल्डोच्या पोर्तुगालला रडवणाऱ्या योआन विसावर झालेला अ‍ॅसिड हल्ला! मृत्यूच्या दारातून प्रेरणादायी पुनरागमन

Monsoon Active Again : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; मॉन्सून पुन्हा होणार सक्रीय, पुढच्या चार दिवसात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT