Uttar Pradesh esakal
देश

CM योगी भाजप कार्यालयात असताना महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भाजप कार्यालयात पोहोचल्यानंतर, महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभा आणि भारतीय जनता पक्षाच्या (BJP) लखनौमधील (Lucknow) कार्यालयासमोर एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) भाजप कार्यालयात (BJP Office) पोहोचल्यानंतर, महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी महिलेला आत्मदहन करण्यापासून रोखलं असून पोलीस (Police) त्या महिलेची चौकशी करत आहेत.

राम प्यारी असं या महिलेचं नाव असून ती लखनौच्या रानीखेडामधील रहिवासी आहे. पोलीस आपल्या मुलाचा छळ करत असल्याचा आरोप या महिलेनं केलाय. महिलेनं सांगितलं की, माझा मुलगा निर्दोष आहे. मात्र, गोसाईगंज पोलीस (Gosaiganj Police) त्याला जबरदस्तीनं तुरुंगात पाठवत आहेत. सध्या महिलेला रुग्णालयात पाठवण्यात आलं असून प्राथमिक उपचारानंतर तिची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

महिला भाजप कार्यालयाबाहेर पोहोचली, तेव्हा तिनं रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला पाहताच पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ महिलेकडून राॅकेलचं कॅन काढून घेतलं आणि आत्मदहन करण्यापासून रोखलं. यादरम्यान महिला गोसाईगंज पोलिसांवर वारंवार आरोप करत होती. यासोबतच महिलेनं सीएम योगी यांच्याकडं न्यायाची मागणी केलीय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आत उपस्थित असताना महिलेनं भाजप कार्यालयाबाहेर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT