Madhya Pradesh accident News Eight killed one injured  Esakal
देश

Accident News: कार्यक्रमावरून घरी परतत असताना भीषण अपघात; पोलीस कॉन्स्टेबलसह ८ जणांचा जागीच मृत्यू, १ जखमी

Accident News: मध्य प्रदेशातील इंदौर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाने बोलेरो कारला जोरदार धडक दिली.

अंकिता खाणे (Ankita Khane)

इंदौरमध्ये काल (बुधवारी) रात्री उशिरा झालेल्या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इंदौर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घाटबिल्लादजवळ हा अपघात झाला आहे.

मध्य प्रदेशातील इंदौर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एका अज्ञात वाहनाने बोलेरो कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला आहे.

मृतांमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलसह ८ जणांचा समावेश आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक गुना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. बुधवारी (ता. १५) ते कारने अलीराजपूरच्या बोरी गावात एका कार्यक्रमासाठी गेले होते.

कार्यक्रमवरून परतत असताना रात्री उशिरा हा अपघात झाला. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर लोक जमा झाले आणि त्यांनी बचावकार्य केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून मृतदेह बेटमा रुग्णालयात आणण्यात आले. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नसून पोलिसांकडून ओळख पटवणे सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT