babulal chaurasia 
देश

गोडसेची पूजा करणारा काँग्रेसमध्ये कसा? भाजप नेत्यानं विचारला सवाल

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ - मध्य प्रदेशात ग्वाल्हेरच्या वॉर्ड नंबर 44 चे नगरसेवक असलेले हिंदू महासभेचे नेते बाबूलाल चौरासिया यांनी काँग्रेसप्रवेश केला. बाबूलाल चौरासिया हे त्या वॉर्डमधील नगरसेवक आहेत जिथं नथूराम गोडसेचं मंदिर उभारण्यात आलं होतं. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावरून भाजपने सवाल केले असून काँग्रेस नेत्यांनीही प्रश्न उपस्थित केले आहेत. बुधवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर चौरासिया यांनी आपण जन्मत: काँग्रेसी असल्याचं म्हटलं आहे. 

गोडसेचं मंदिर आणि पूजा केल्याबद्दल विचारले असता चौरासिया म्हणाले की, हिंदू महासभेनं मला अंधारात ठेवून गोडसेची पूजा करून घेतली होती. गेल्या दोन तीन वर्षांपासून यापासून मी स्वत:ला दूर ठेवलं होतं. माझ्या मनाला हिंदू महासभेची विचारसरणी पटली नाही. मी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढलो होतो आणि जिंकलोही होतो. निवडणुकीत जेव्हा तिकिट कापलं आणि हिंदू महासभेनं त्यांच्या पक्षाकडून निवडणूक लढण्यास सांगितलं तेव्हा मी अर्ज दाखल केला. मात्र आता मी माझ्या कुटुंबात परत आलो आहे अशी भावना चौरासियांनी व्यक्त केली. दरम्यान, यावर मध्यप्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष अरुण यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी याविरोधात मत मांडलं आहे. अरुण यादव यांनी ट्विटरवर बापू आम्हाला लाज वाटते असं म्हटलं आहे. 

बाबूलाल चौरासिया यांना पक्षात घेण्यासाठी पुढाकार घेणाऱे ग्वाल्हेरचे आमदार प्रवीण पाठक यांनी सांगितलं की, आधी चौरासिया काँग्रेसमध्ये होते मात्र नंतर त्यांनी हिंदू महासभेकडून निवडणूक लढवली. त्यानंतर चौरासिया नगरसेवक म्हणून निवडून आले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी वडिलांच्या खून्यांना माफ केलं, इतके ते मोठ्या मनाचे आहेत. त्यांच्या विचारांच्या मूल्यांमुळेच आज गोडसेची पूजा करणारी व्यक्ती गांधीजींची पूजा करू लागला. 

चौरासियांच्या काँग्रेस प्रवेशावर भाजपने खिल्ली उढवली आहे. भाजप नेत्यांनी काँग्रेसला विचारलं की, गोडसेची पूजा करणारा काँग्रेसमध्ये कसा काय? गोडसेची पुजा केली आता काँग्रेसमध्ये प्रवेश, यातून काँग्रेसचे दोन चेहरे समोर येत आहेत असं राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं. आरोग्य मंत्री विश्वास सारंग यांनी म्हटलं की, काँग्रेसच्या बोलण्यात आणि कृतीत फरक आहे. काँग्रेस राजकीय फायद्यासाठी काहीही करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

'दृश्यम'च्या पहिल्या दोन भागात दिसला पण तिसऱ्यात नाही, मराठी अभिनेत्याला वाटतंय वाईट; म्हणतो - गायतोंडेने...

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

Mumbai News: 'ती' चारचाकी आयात नव्हे! उच्च न्यायालयाचे सीमा शुल्क विभागाला आदेश

SCROLL FOR NEXT