Madhya Pradesh News 
देश

BJP कार्यकर्त्याचा हात कापणाऱ्याच्या घरावर चालवला बुलडोझर; मध्य प्रदेशात यादव सरकार स्थापन होताच मोठी कारवाई

विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर ५ डिसेंबरला फारुखने भाजप कार्यकर्ता देवेंद्र ठाकूर याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता.

Sandip Kapde

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशात मोहन यादव सरकार स्थापन होताच मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. काल (बुधवार) मोहन यादव यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी लाऊड स्पीकरवर अनियंत्रित आवाजावर तसेच उघड्यावर मास विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली. आज भाजप कार्यकर्त्याचा हात कापणाऱ्याच्या घरावर यादव सरकारने बुलडोझर चालवला.

भाजप कार्यकर्त्याचा हात कापणारा आरोपी फारुख राइन उर्फ ​​मिन्नी याच्या घरावर प्रशासनाने बुलडोझर चालवण्याचे आदेश दिले. भोपाळ येथील जनता कॉलनी क्रमांक 11 येथील आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला. आरोपी फारुख राइनवर भाजप कार्यकर्ता देवेंद्र ठाकूर याचा हात कापल्याचा आरोप होता.

मध्य प्रदेश विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर ५ डिसेंबरला फारुखने भाजप कार्यकर्ता देवेंद्र ठाकूर याच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. यामध्ये देवेंद्र याचा हात कापला गेला होता. देवेंद्रला गंभीर परिस्थीत रुग्णालयात दाखल करण्यात आले.  कैलाश विजयवर्गीय यांनी रुग्णालयात जाऊन देवेंद्र ठाकूर याची भेट घेतली होती.

आरोपी फारुखचा हबीबगंज पोलिसांच्या गुंडा यादीत समावेश असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलिसांनी फारुख राइन, अस्लम, शाहरुख, बिलाल आणि समीर या पाच आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT