shivraj singh chouhan1 
देश

मध्य प्रदेश सोडा, नाहीतर जमिनीत गाडेन; मुख्यमंत्र्यांनी दिली धमकी?

सकाळन्यूजनेटवर्क

भोपाळ- मध्य प्रदेशचे (Madhya Pradesh) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी माफियांना कठोर शब्दांत इशारा देत म्हटलंय की, त्यांनी मध्य प्रदेश सोडून द्यावं, अन्यथा त्यांना 10 फूट जमिनीमध्ये गाडण्यात येईल. ते एका सभेला संबोधित करत होते. 

आज काल मी खतरनाक मूडमध्ये आहे. गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही, मामा फॉर्ममध्ये आहे. माफियांच्या विरोधात मध्य प्रदेश सरकारने अभियान सुरु केलं आहे. बळाचा वापर करुन काहीही करता येणार नाही, ऐकून घ्या, मध्य प्रदेश सोडून द्या, अन्यथा तुम्हाला जमिनीत पुरुन टाकेन, कोणाला पत्ताही लागणार नाही, असं मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी धमकावलं आहे. 

शिवराज सिंह पुढे म्हणाले की, ''सुशासनचा अर्थ आहे, जनतेला त्रास होऊ नये. दादा, गुंड, बदमाश अशा कुणाचीही आता चालू देणार नाही. दे सुशासन आहे''

काही दिवसांपूर्वी शिवराज सिंह यांनी जबलपूरमध्ये एका सभेला संबोधित करताना असंच वक्तव्य केलं होतं. त्यांनी माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा उल्लेख करताना म्हटलं होतं की, कमलनाथ जी ऐका, माझी जनताच माझी देव आहे. माफियांना मुळासकट नष्ट करेन. ड्रग्ज व्यापारी, भू माफिया आणि गूंडाना आता शांत झोप लागणार नाही. मला आता कोणी अडवू शकत नाही.

मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरुनही विरोधकांवर हल्लाबोल केला होता. माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्गी राजा यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांबाबत अचानक प्रेम निर्माण झालं आहे. विरोधकांच्या उपवासावर टोला लगावताना ते म्हणाले होते की, उपवास ठेवायचाच असेल तर पश्चातापासाठी ठेवा. कारण तुम्हीच शेतकऱ्यांना रडवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT