mp cm hoshangbad name narmadapuram 
देश

शिवराजसिंह यांचे योगींच्या पावलावर पाऊल; मुघलकालीन शहराचं बदलणार नाव

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ, ता. २३ ः होशंगाबाद शहराचे नाव बदलून ते नर्मदापुरम करणार असून तसा प्रस्ताव केंद्र सरकारला लवकरच पाठवू, अशी माहिती मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली.

नर्मदेच्या किनाऱ्यावरील होशंगाबादमध्ये नुकताच नर्मदा जयंती कार्यक्रम झाला. त्यावेळी चौहान यांनी उपस्थितांनाच प्रश्न केला की, सरकारने तुमच्या शहराचे नाव बदलावे का, त्यावर होकारार्थी प्रतिसाद येताच त्यांनी पुढील प्रश्न केला, नवे नाव काय असावे. तेव्हा नर्मदापुरम असे नाव सांगण्यात आले.

नर्मदेच्या किनाऱ्यावर सिमेंट-काँक्रिटच्या बांधकामांना परवानगी दिली जाणार नाही. किनाऱ्यावरील गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली,

हा ऐतिहासिक क्षण आहे. हल्लेखोर होशंग शाह याच्या नावाने हे शहर ओळखले जात होते, पण आता माँ नर्मदाचे नाव मिळेल, जी मध्य प्रदेशची जीवनदायिनी आहे.
- रामेश्वर शर्मा, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

फटाके वाजवून स्वागत
भाजप कार्यकर्त्यांनी या घोषणेचे फटाके वाजवून स्वागत केले. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी यात पुढाकार घेतला. होशंगाबादचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी त्यांनी यापूर्वीच केली होती.
हे वाचा - मोठी बातमी! महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'कोरोना' नियम

काँग्रेसची टीका
काँग्रेसचे प्रवक्ते भूपेंद्र गुप्ता यांनी हा सत्ताधारी भाजपचा महागाई आणि इंधनदरवाढीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली. ते म्हणाले की, भाजपने केवळ मुघलांशी संबंधित नावेच बदलली आहेत. ब्रिटिश काळातील नावे तशीच आहेत. विधानसभेची जुनी इमारत मिंटो हॉल म्हणूनच ओळखली जाते. वास्तविक सरकारने विकासावर लक्ष केंद्रित करून जनतेला दिलासा पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT