Madhya Pradesh News
Madhya Pradesh News esakal
देश

सात मुलांच्या सैराट आईचं प्रियकरासोबत पलायन

सकाळ डिजिटल टीम

'माझी पत्नी तिच्या ओळखीच्या राम किशनसोबत पळून गेलीय.'

'प्रेम' आंधळं असतं, असं म्हणतात आणि या प्रेमाच्या आंधळेपणात सात मुलांची आई आपल्या पतीला तिच्या जबाबदाऱ्या झटकून प्रियकरासोबत पळून गेलीय. हे प्रकरण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छतरपूरमधील (Chhatarpur) आहे. या 'सैराट' महिलेनं घरातून काही महत्त्वाची कागदपत्रं आणि रोख रक्कमही नेल्याचा आरोप आहे.

मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील मातंगवा पोलीस ठाण्याच्या (Matangwa Police Station) शुक्ला पूर्वा इथं राहणारी कमला यादव (Kamala Yadav) ही महिला पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेलीय. कमला 7 मुलांची आई आहे, त्यापैकी 5 मुली आणि 2 मुलं आहेत. कमलानं धाकट्या मुलालाही सोबत घेतलंय. तक्रारदार पती अशोक यादव यांनी सांगितलं की, माझी पत्नी तिच्या ओळखीच्या राम किशन शुक्लासोबत पळून गेलीय. पळून जाताना घरातून तिनं आवश्यक कागदपत्रं, आधार कार्ड, पासबुक आणि इतर अनेक कागदपत्रांव्यतिरिक्त 35 हजारची रोकड नेलीय.

या प्रकरणात पोलिसांनी निष्काळजीपणा करुन एफआयआरसाठी 2500 रुपये घेतल्याचा आरोप अशोक यादव (Ashok Yadav) यांनी केलाय. या घटनेला 10 दिवसांहून अधिक काळ लोटला असून, तक्रारदार पती सातत्यानं पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहे. याप्रकरणी कमला यादव हरवल्याची नोंद करून तपास सुरू केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT