देश

'पेट्रोल स्वस्त आहे, तालिबानकडे जा', भाजप नेत्याचा VIDEO व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

देशात सध्या काय परिस्थिती आहे हे तुम्ही कधी जाणून घेतलं का? असा सवाल करताना त्यांनी मोदींचे कौतुकही केले.

भोपाळ - मध्य प्रदेशात भाजप नेत्यानं वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर वादग्रस्त विधान केलं आहे. इंधनाच्या वाढलेल्या दरावरून प्रश्न विचारताच भडकलेल्या भाजप नेत्यानं पत्रकाराला तालिबानची सत्ता असलेल्या अफगाणिस्तानात जा असं म्हटलं आहे. मध्य प्रदेशात भाजपचे कटनी जिल्हाध्यक्ष असलेल्या रामरतन पायल यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये रामरतन असं बोलतात की,'तुम्ही तालिबानकडे जा. अफगाणिस्तान पेट्रोल 50 रुपये लिटर देत आहे. तिथं जा आणि पेट्रोल भरा, सध्या इंधन भरण्यासाठी तिथं कोणी नाही. किमान इथं आपण सुरक्षित तरी आहे.'

समर्थकांच्या गराड्यात असलेले रामरतन पायल यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीतीही व्यक्त केली. मात्र दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते मास्कशिवाय दिसत होते. चर्चेवेळी त्यांनी लोकांकडून कोरोनाच्या निर्बंधांचे आणि नियमांचे पालन करत नसल्यावरूनही सल्ले दिले. तसंच देशात सध्या काय परिस्थिती आहे हे तुम्ही कधी जाणून घेतलं का? असा सवाल करताना त्यांनी मोदींचे कौतुकही केले. मोदी ही परिस्थिती सांभाळत आहेत. अजुनही ते 80 कोटी लोकांना फ्री रेशन देत आहेत असं रामरतन यांनी म्हटलं.

याआधी बिहारमध्ये भाजप आमचार हरिभूषण ठाकूर यांनी म्हटलं होतं की, भारतात ज्यांना असुरक्षित वाटतंय त्यांनी युद्धजन्य परिस्थिती असलेल्या पाकिस्तानात जाण्याचा पर्याय आहे. ज्या लोकांना भारतात भीती वाटते त्यांनी अफगाणिस्तानमध्ये जावं, तिथं पेट्रोल डिझेलही स्वस्त आहे. अफगाणिस्तानातील परिस्थितीचा भारतावर काही परिणाम होणार नाही असेही ते म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT