road accident sakal media
देश

ओव्हरटेक करणे भोवले; अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नदीजवळ ऑटोरिक्षा ट्रकला ओव्हरटेक करीत असताना पलटी झाला

सकाळ डिजिटल टीम

मध्य प्रदेश : धान भरलेला ट्रक अमरपाटणकडे जात होता. नदीजवळ ऑटो ट्रकला ओव्हरटेक करीत असताना पलटी झाल्याने चार जणांचा मृत्यू (Four people killed) झाला. ही घटना रविवारी (ता. १६) सतना येथे घडली. या भीषण अपघातात (terrible accident) एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर ऑटो चालकही ठार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतना जिल्हा मुख्यालयापासून सुमारे २० किमी अंतरावर असलेल्या इटमा नदीच्या तीर गावाजवळ ट्रक खरेदी केलेला धान अमरपाटणकडे घेऊन जात होता. नदीजवळ ऑटोरिक्षा ट्रकला ओव्हरटेक करीत (terrible accident) असताना पलटी झाली. ऑटोरिक्षात ज्ञानेंद्र मिश्रा, त्यांची आई, पत्नी आणि मुलगी बसली होती. ऑटो पलटल्याने चालक लखपतीसह ज्ञानेंद्र मिश्रा यांची आई बंतना देवी मिश्रा, पत्नी निर्मला मिश्रा आणि मुलगी रितू मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (shivraj singh chouhan) यांनी सतना जिल्ह्यातील अमरपाटण येथे झालेल्या रस्ता अपघातात चार नागरिकांच्या अकाली मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी अपघातात जखमी झालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले.

दुसरी मोठी दुर्घटना टळली

सतना शहरातच दुसरी मोठी दुर्घटना टळली. शहरातील सर्वांत वर्दळीच्या स्टेशन रोडवर धानाने भरलेल्या ट्रकचे चाक घसरले. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. ज्या ट्रकचे चाक बाहेर आले तो ओव्हरलोड असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT