Rape case sakal media
देश

लग्नपत्रिका द्यायला गेली होती; अपहरण करून केला महिनाभर बलात्कार

तरुणी आपल्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका द्यायला गेली असताना तीचे अपहरण करण्यात आलं होतं.

दत्ता लवांडे

झांशी : मध्यप्रदेशमधीस झांशीमध्ये एका १८ वर्षाच्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ती तरुणी आपल्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी लग्नपत्रिका द्यायला गेली असताना तीचे अपहरण करण्यात आलं होतं.

(Crime News)

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशमधील झांशी जिल्ह्यात पिडीत महिला १८ एप्रिल रोजी आपल्या लग्नाच्या पत्रिका देण्यासाठी एका गावात गेली असताना तीचे गावातील तीन तरुण आरोपींनी अपहरण केलं होतं. त्यानंतर तीला निर्जनस्थळी नेऊन तीच्यावर सामुहिक बलात्कार केला होता. तीला त्याच गावातील एका घरी ठेवण्यात आलं होतं. तीन आरोपींनी काही दिवस आळीपाळीने बलात्कार केल्यावर त्यांनी पिडितेला एका स्थानिक नेत्याकडे सूपुर्द केले होते. स्थानिक नेत्यांनी तीला झाशी जिल्ह्यात एका ठिकाणी ठेऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केला.

काही दिवसांच्या आत्याचारानंतर स्थानिक नेत्याने दाटिया जिल्ह्यातील एका व्यक्तीकडे सुपूर्द केलं होतं. जवळपास महिनाभर तीच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तीने एका दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने आपल्या घरी फोन लावला आणि आपली सुटका करुन घेतली होती. त्यानंतर तीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी तेहरौली मंडळ अधिकारी अनुज सिंह यांनी सांगितलं की, महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींवर अपहरण, वारंवार बलात्कार, सामूहिक बलात्कार अशा कलमाखाली गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत असून त्यांच्यावक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Sugarcane Payment: ऊस बिलासाठी महिलांनाही रस्त्यावर काढावी लागली रात्र; गोकुळ शुगरने १३० कोटी रुपये थकविले, २०० शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून ठिय्या

Video : अखेर राकेशचं खरं रूप अंजलीसमोर येणार ! मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षक खुश, म्हणाले..

Mira Road: बकरी ईदच्या कुर्बानीला बकरा आणला, विरोध म्हणून हिंदुत्ववाद्यांनी डुक्कर आणलं; मिरा रोड परिसरात तणाव, VIDEO VIRAL

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? काँग्रेस वापरणार भाजपचा 'बिहार पॅटर्न'

SCROLL FOR NEXT