photo esakal
देश

सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोबाईल वापराला बंदी - मद्रास HC

या निकालबाबत मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला सांगितले की...

सकाळ डिजिटल टीम

या निकालबाबत मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला सांगितले की...

चेन्नई - सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत वैयक्तिक वापरासाठी मोबाइल फोन वापरण्याची परवानगी देऊ नये, असा निर्णय आज मद्रास उच्च (High Court) न्यायालयाने दिला आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एम. सुब्रमण्यम यांनी तामिळनाडू सरकारला याबाबत नियम बनवण्यास सांगितले आहे. या निकालबाबत मद्रास उच्च न्यायालयाने (Madras HC) तामिळनाडू सरकारला सांगितले की, राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत वैयक्तिक वापरासाठी मोबाइल फोन वापरण्याची परवानगी देऊ नये आणि या संदर्भात नवीन नियम बनवून आदेश द्या, असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारनेही याबाबत एक आदेश जारी केला होता. देशातील पेगॅसस स्पायवेअर प्रकरणावरुन जोरदार चर्चेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने कर्मचार्‍यांना कार्यालयीन वेळेत मोबाईल फोनचा वापर कमी करण्यास सांगितले होते. कार्यालयीन वेळात मोबाइल फोनचा अंदाधुंद वापर केल्याने सरकारची प्रतिमा धुळीस मिळते, असे या आदेशात म्हटले होते. राज्य शासकीय अधिकारी आणि सरकारी कर्मचार्‍यांनी अधिकृत कामांसाठी आवश्यक असल्यास मोबाइल फोनचा वापर करावा असं या आदेशात सांगण्यात आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Fraud: मॅनेजरने पत्नी आणि मेव्हण्यासोबत उडवले ५९० कोटी; देशातील मोठ्या बँकेतून पैसे कसे गायब झाले?

Latest Marathi News Live Update : बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

Somnath Suryawanshi Case: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

SCROLL FOR NEXT