Taj_Mahal 
देश

महाशिवरात्रीला ताज महलमध्ये शिव पूजा; हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

सकाळन्यूजनेटवर्क

आग्रा- महाशिवरात्रीचे निमित्त साधून अखिल भारत हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी ताजमहलमध्ये भगवान शंकराची पूजा केल्याचा प्रकार घडला आहे.  CISF ने तीन महासभेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांच्या हवाले केले आहे. पोलिसांनी या तीन पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सकाळी हिंदू महासभेचे प्रांतीय अध्यक्ष मीना दिवाकर आणि दोन कार्यकर्ते सेंट्रल टँकजवळ डायना बँचजवळ आरती करण्यासाठी पोहोचले होते. त्याचवेळी सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या CISF जवानांनी त्यांना पाहिलं. जवानांनी मीना दिवाकर आणि कार्यकर्त्यांना पूजा करण्यास विरोध केला. कार्यकर्त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही आणि त्यांनी पूजा करण्यास सुरुवात केली. यावेळी जवानांनी त्यांना ताब्यात घेतले आणि ताजगंज पोलिसांच्या स्वाधीन केले. 

ताजगंज पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी उमेशचंद्र त्रिपाठी यांनी सांगितलं की, याप्रकरणी CISF ने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना तुरुंगात पाठवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच या प्रकरणी तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे अशी घटना पहिल्यांदा घडलेली नाही. यापूर्वीही कथित हिंदू कार्यकर्त्यांनी ताज महलला तेजो महाल म्हणत तेथे पूजा-अर्था करण्याचा प्रयत्न केला आहे. 

हिंदू कार्यकर्त्यांची निदर्शने

या प्रकरणाची माहिती हिंदूवाद्यांना मिळाल्यानंतर त्यांनी ताजगंज पोलिस स्टेशन गाठले आणि जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यांनी तिन्ही आरोपींना सोडण्याची मागणी केली आणि पोलिस स्टेशनसमोर शिव तांडव नृत्य सुरु केला. ताजमहलमध्ये उर्स होत असेल तर मग तेजो महालात भगवान शंकराची पूजा का होऊ शकत नाही, असा प्रश्न त्यांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT