Bhupesh Baghel sakal
देश

Mahadev Betting App : महादेव बेटिंग ॲपकडून बघेल यांना ५०८ कोटी?

छत्तीसगडमधील निवडणुकीसाठी महादेव ॲपच्या प्रवर्तकांकडून पैसे पाठविले जात असल्याची

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - ‘‘महादेव बेटिंग ॲपच्या प्रवर्तकांनी आतापर्यंत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ५०८ कोटी रुपये दिले आहेत, असा जबाब रोख रक्कम पोचविणाऱ्या ‘कुरिअर कंपनीने’ दिला आहे. ही तपास करण्यासारखी बाब आहे,’’ असे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज म्हटले आहे.

छत्तीसगडमधील निवडणुकीसाठी महादेव ॲपच्या प्रवर्तकांकडून पैसे पाठविले जात असल्याची माहिती ‘ईडी’ला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी असीम दास याला अटक केली. त्याच्याकडून ५.३९ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. हे पैसे छत्तीसगडमधील एका राजकीय नेत्याला निवडणुकीसाठी देण्यात येणार होते, असे त्याने चौकशी दरम्यान सांगितल्याचा ‘ईडी’चा दावा आहे.

ईडीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘‘असीम दास याच्या चौकशीतून तसेच त्याच्या फोनच्या न्यायवैद्यक चाचणीतून तसेच या प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी शुभम सोनी याने त्याला पाठविलेल्या ईमेलमधून पैशांच्या व्यवहाराची माहिती मिळाली आहे. यापूर्वीही नियमितपणे पैसे पोचविण्यात आले होते आणि आतापर्यंत ५०८कोटी रुपये महादेव ॲपच्या प्रवर्तकांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना दिले आहेत, अशी माहिती पुढे आली आहे.’’

या सर्व गोष्टींची तपासणी करण्याची गरज आहे, असेही ‘ईडी’ने म्हटले आहे. ‘ईडी’च्या माहितीनुसार त्यांनी हॉटेल ट्रायडन आणि भिलाईमधील अन्य एका ठिकाणी तपासणी करण्यात आली आणि रोख पैसे घेऊन जाणारे कुरिअर पकडण्यात आले. हे घेऊन जाणाऱ्या असीम दासच्या घरातूनही काही रक्कम जप्त करण्यात आली.

पैशांच्या व्यवहारासाठी दासला संयुक्त अरब अमिरातीमध्येही पाठविण्यात आल्याची माहितीही चौकशीत मिळाली आहे. महादेव ॲपचे प्रवर्तक संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहेत. ‘‘ही रक्कम छत्तीसगडमधील राजकीय नेते ‘बघेल’ यांना द्यायची होती,’ असे दासने मान्य केल्याचेही ‘ईडी’ने म्हटले आहे.

सट्टेबाजीशी संबंधित या ‘ॲप’शी संबंधित काही बेनामी खात्यांचीही माहिती मिळाली आहे. त्यातील १५.५९ कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये सात नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यातील चार दिवस आधीच बघेल यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: भर पावसात फूड डिलिव्हरी बॉय पडला पाण्यात; पुण्यातला व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

KKR vs SRH Live : पुन्हा २०० पार... ट्रॅव्हिस, अभिषेक, हेनरिच, नितीश यांची तुफान फटकेबाजी; कोलकातासमोर तगडे लक्ष्य

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT