Maharashtra becomes first state to administer over 5 million COVID19 vaccine doses 
देश

देशात लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर; पाच दशलक्ष डोसचा टप्पा गाठणारं पहिलं राज्य

सकाळवृत्तसेवा

मुंबई  :  महाराष्ट्रात सध्या कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना एकट्या महाराष्ट्रात त्यापैकी साधारण 65 टक्के रुग्ण दररोज सापडत आहेत. तर दुसऱ्या बाजूला देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा येत्या 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशात 5 दशलक्षहून अधिक लसीचे डोस देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. याबाबत बोलताना आरोग्य सेक्रेटरी डॉ. प्रदीप व्यास यांनी आज गुरुवारी म्हटलं की, कोरोना लसीकरणाच्या मोहीमेमध्ये महाराष्ट्र राज्य सध्या आघाडीवर आहे. तसेच 5 दशलक्षहून अधिक लसीकरण करण्याचा महत्त्वाचा टप्पा देखील महाराष्ट्रानेच सर्वांत आधी गाठला आहे. 

राज्यामध्ये लसीचा दुसरा डोस 6,72,128 जणांना देण्यात आला आहे. या आकडेवारीसह राज्यातील एकूण लसीकरणाचा आकडा 50,14,774 वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये आतापर्यंत 5.31 कोटींहून अधिक लोकांना लस दिली गेली आहे. एकूण आकडेवारीकडे पाहता 16 जानेवारीपासून सुरु करण्यात आलेल्या लसीकरणामध्ये आतापर्यंत देशात 5,31,45,709 जणांना लस देण्यात आली आहे. महाराष्ट्र 50,14,774 लसीचे डोस देऊन आघाडीवर आहे. त्याखालोखाल राजस्थानमध्ये 49,94,574 लसीचे डोस देऊन दुसऱ्या स्थानी आहे. तर त्याखालोखाल तिसऱ्या स्थानावरील उत्तर प्रदेशमध्ये 47,56,799 लसीचे डोस देण्यात आले आहेत.  काल बुधवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात काल 31,855 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 15098 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर काल राज्यात 95 जणांचा मृत्यू झालेला आहे. 

भारतात काल 53,476 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर काल 26,490 रुग्ण बरे झाले आहेत. देशात 251 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज गुरुवारी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगढ आणि गुजरात ही पाच राज्ये सध्या कोरोनाच्या हाहाकाराने सर्वाधिक पीडित राज्ये आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येच्या 77.44 टक्के नवे रुग्ण या पाच राज्यांमध्ये आढळत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: अहिल्यानगरमध्ये मोठा अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल झाले, ९ वाहनांना धडक दिली अन्...; भीषण घटना

Paralysis Warning Signs : पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात दिसतात 'हे' 2 बदल; चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर जीव गमवाल

Pooja Khedkar: पुजा खेडकर कुटुंबाचा नवा वाद! नवी मुंबईतील अपहरणकर्ता पुण्यातील घरी आढळला, पोलिसांचा तपास सुरू...

Latest Marathi News Updates: ठाकरे गटाच्या खासदारांनी धाराशिव येथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले - चंद्रशेखर बावनकुळे

Dhule News : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT