Corona Update- 
देश

Corona Update: कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार; 491 जणांचा मृत्यू

कार्तिक पुजारी

काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजारांच्या आत नोंदली जात आहे. रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळतीये. गेल्या 24 तासांत देशात 39 हजार 070 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत,

नवी दिल्ली Corona Update- काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजारांच्या आत नोंदली जात आहे. रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळतीये. गेल्या 24 तासांत देशात 39 हजार 070 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर दिवसभरात 43 हजार 910 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी देशात 491 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली. (india corona update)

आतापर्यंत देशात 3 कोटी 19 लाख 34 हजार 455 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर आतापर्यंत एकूण 3 कोटी 10 लाख 99 हजार 771 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या कोरोनाचे 4 लाख 06 हजार 822 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील कोरोनाबाधित मृतांची संख्या 4 लाख 27 हजार 862 एवढी झाली आहे. काही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या जास्त नोंदली जात आहे. त्यात प्रामुख्याने केरळ राज्याचा समावेश आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. भारत सरकारने आतापर्यंत 50 कोटींपेक्षा अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे. शनिवारी देशात 55 लाख 91 हजार 657 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. आतापर्यंत 50 कोटी 68 लाख 10 हजार 492 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस घेतला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी

राज्यात दिवसभरात 6 हजार 061 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 128 लोकांचा गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत 63 लाख 47 हजार 820 कोरोना रुग्णांची नोंद झालीये, तर 61 लाख 39 हजार 493 रुग्णांनी विषाणूवर मात केलीय. राज्यातील सक्रिय रुग्णांपैकी (active patient) 32 हजार 250 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी 13.72% रुग्ण गंभीर आहेत. पुण्यासह ठाणे शहरात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. राज्यात 7 ऑगस्ट पर्यंत 74,995 सक्रिय रुग्णांची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT