संत गजानन महाराज की जय म्हणत राहुल गांधींनी सभेला सुरूवीत केली.
महाराष्ट्रतील उद्योग राज्याबाहेर जाण्यामागे शिंदे सरकार आहे, आसं म्हणत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे.
कस्तुरबा सरकारी महाविद्यालयातील प्रयोगशाळेत कथित रासायनिक वायू गळतीमुळे 25 विद्यार्थ्यांना चक्कर येवून आजारी पडले आहेत. बाधित विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणत्या गॅसची गळती झाली हे तपासण्यासाठी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे.
राहुल गांधी शेगाव मंदिरात दाखल झाले आहेत. ते गजानन महाराजांचे दर्शन घेवून पुढे जाहीर सभेला संबोधीत करणार आहेत.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टी ऐतिहासिक पार्कच्या पहिल्या चरणाचा लोकार्पण सोहळा अमित शहा यांच्या हस्ते होणार होता मात्र शाह यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे.
मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. किरीट सोमय्या, नील सोमय्या यांच्याशी संबंधीत तक्रार करणारा तक्रारदारच बोगस होता, असा दावा सोमय्यांनी केला आहे. किरीट सोमय्या म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा गैरवापर करुन कोर्टात खोटे शपथपत्र दाखल केले. तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याशी संगनमत करुन मंत्रालयाला गुंडाचा अड्डा बनवला.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Kerala Governor Arif Mohammad Khan) यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अजेंड्याचा प्रचार केल्याचा आरोप झाल्यानंतर ते चांगलेच भडकले आहेत. त्यांनी आरोपांना चोख प्रत्युत्तर देत म्हटलंय, मी आरएसएसचा अजेंडा चालवत नाही. जर कोणी हा आरोप सिद्ध केला तर मी ताबडतोब राजीनामा देईन. गेली तीन वर्षे तुम्ही म्हणताय की, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत आहे. मला एक नाव द्या, फक्त एक उदाहरण द्या जिथं मी तुम्हाला राजकीय त्रास देणार्या कोणाचीही नियुक्ती केली आहे. RSS, BJP मधील एका व्यक्तीचं नाव सांगा ज्याची मी माझ्या अधिकाराचा वापर करून नियुक्ती केलीय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी शुक्रवारी नॅशनल कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता पक्षाच्या नूतन अध्यक्षाची निवडणूक ५ डिसेंबरला होणार आहे. ओमर अब्दुल्ला यांची पक्षाचे नवे प्रमुख म्हणून एकमतानं निवड होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते तन्वीर सादी यांनी फारुख अब्दुल्ला यांच्या राजीनाम्याला दुजोरा दिला आहे.
राहुल गांधीविरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी चिखलीमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांच्या गाड्या अडवल्या आहेत. आज शेगावमध्ये राहुल गांधी यांची सभी होणार आहे.
Rishi Sunak Government: ब्रिटनमध्ये मंदीचं संकट कोसळलं आहे. ब्रिटनचे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी आणीबाणीचा अर्थसंकल्प सादर केला. नव्यानेच पंतप्रधानपदी विराजमान झालेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक या संकटातून कसा मार्ग काढतात, याकडे जगाच्या नजरा लागलेल्या आहेत.
Satara News : साताऱ्यातील दोन्ही राजेंमधील वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. दररोज एकमेकांविरुध्द आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. आता या वादात आणखी ठिणगी पडलीय. ज्यांना जनतेनं मनापासून आणि कायमस्वरुपी पालिकेतून रिटायर्ड केलं, त्यांनी सातारा विकास आघाडीनं आता रिटायर्डमेंट घ्यावी, असा सल्ला देणं म्हणजे चोंबडेपणा आहे, असा टोला खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना लगावला. आमदारांनी आता रियल इस्टेटचा व्यवसाय मंदावला असल्यास चोंबडे सल्ले देण्याचा नवीन व्यवसाय सुरु करावा, असा सल्लाही उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना दिला. दोन दिवसांपूर्वी शिवेंद्रसिंहराजेंनी (Shivendrasinghraje Bhosale) सातारा विकास आघाडी आणि खासदार उदयनराजेंवर जोरदार टीका केली होती. त्याला आता उदयनराजेंनी प्रत्युत्तर दिलंय.
भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबडे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा जामीन मंजूर केला. तेलतुंबडे यांना 2020 पासूल तळोजा तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचे पुण्यात पडसाद पहायला मिळत आहेत. पुण्यात भाजप आक्रमक झाली असून भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते थेट काँग्रेस भवन समोर येऊन जोरदार घोषणाबाजी करत आहेत.
भारत जोडो यात्रेसाठी देशभरात फिरणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इंदौरमध्ये बॉम्बने उडवू अशी धमकी देण्यात आली आहे. इंदौरमधल्या एका दुकानात हे पत्र आलं आहे. इंदौरमधल्या एका मिठाईच्या दुकानात हे निनावी पत्र पाठवण्यात आलं आहे. २४ नोव्हेंबरला राहुल गांधी इंदौरमध्ये जाणार आहेत. त्या आधी हे धमकीचं पत्र आलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस आता सतर्क झाले असून हे पत्र पाठवणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.गलेला नाही. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही चेक करण्यात येत आहे.
Skyroot Aerospace Vikram-S Launch : देशात प्रथमच खासगी अंतराळ कंपनी “स्कायरूट”नं शुक्रवारी (18 नोव्हेंबर, 2022) आपलं पहिलं रॉकेट विक्रम-एस लॉन्च केलं. कंपनीचे विक्रम-एस रॉकेट सकाळी 11.30 वाजता श्रीहरिकोटा येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) लाँचपॅडवरून प्रक्षेपित करण्यात आलं. स्कायरूट एरोस्पेसनं दोन वर्षांत विक्रम-एस रॉकेट विकसित केलं आहे. कंपनीसाठी हे प्रक्षेपण महत्त्वपूर्ण आहे.
पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर माफीवीरचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल पुरावे सादर केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले असून पुण्यातील सारसबाग चौकात असलेल्या विनायक सावरकर यांच्या पुतळ्याच्या समोर माफीवीर व राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स लावले आहेत.
India and New Zealand 1st T20I Rain May Spoil The Game : टी 20 वर्ल्डकपमध्ये भारताचे आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आल्यानंतर भारतीय टी 20 संघात मोठे बदल करण्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभुमीवर न्यूझीलंड दौऱ्यावर असलेली भारताची युवा टी 20 टीम आजपासून तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळत आहे. संघातील युवा खेळाडूंसह भविष्यातील टी 20 कर्णधार हार्दिक पांड्या कशी कामगिरी करतोय हे पाहणे देखील गरजेचे आहे. मात्र पहिल्याच टी 20 सामन्यावर वरूणराजाने वक्रदृष्टी टाकल्याने सामन्यावरच बालट आले आहे. अॅक्यूवेदर नुसार वेलिंग्टनमध्ये आज 81 टक्के पावसाची शक्यता आहे. वेलिंग्टनमध्ये पावसाच्या सरी साधारणपणे संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळानुसार सकाळी 11.30) कोसळण्याची शक्यता आहे. सामना हा भारतीय वेळेनुसार 12 वाजता सुरू होणार आहे.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विषय काढला आणि राज्यभरात गदारोळ माजला आहे. राहुल गांधींच्या सावरकरांविषयीच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. याच वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडू शकते, असं सूचक विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज सकाळी संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आपण राहुल गांधींच्या विधानाशी सहमत नसल्याचं सांगितलं.
Rahul Gandhi News : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांची शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नेत्या वंदना सुहास डोंगरे (Vandana Suhas Dongre) यांनी राहुल गांधींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भात हा एफआयआर दाखल करण्यात आलाय. खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ठाणे नगर पोलीस स्थानकात (Thane Nagar Police Station) तक्रार दाखल करण्यात आलीय.
महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळण्याच्या अवघ्या एक दिवस आधी मंजुरी मिळालेली पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची 381 कोटी रुपयांची प्रादेशिक पर्यटन विकास योजना सुरू ठेवण्याबाबत शिंदे सरकार संभ्रमात आहे. सत्तेत येताच जुलैमध्ये शिंदेंनी योजनेला स्थगिती दिली. नंतर 2022-23 सोबतच गेल्या वर्षीच्या कामांवरील स्थगिती उठवून निधीही मंजूर केला. मात्र, निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याआधीच पुन्हा एकदा या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं. महाराष्ट्र सरकारनं पुन्हा एकदा GR जारी केला असून 2 नोव्हेंबरच्या GR ला स्थगिती दिलीय.
पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेसवर दगडफेक झाली आहे. लोणावळाजवळ ही घटना घडल्याचं समजतं. मात्र, याची पुष्टी अजून पोलिसांनी केलेली नाही. दगडफेकीदरम्यान एका प्रवाशाच्या डोक्याला दगड लागल्यानं प्रवासी जखमी झाली आहे. रेल्वे धावत असताना ठिकठिकाणी टोळक्यांकडून दगडफेकीच्या यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'नो मनी फॉर टेरर' (No Money for Terror) या आंतरराष्ट्रीय मंत्रिस्तरीय परिषदेचं उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, ही परिषद भारतात होत आहे. अनेक दशकांपासून दहशतवादानं आपल्या देशाला दुखावण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही त्याविरुद्ध धैर्यानं लढलो, असं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.