आज झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत गोपालगंज (बिहार) मध्ये 48.35%, मोकामा (बिहार) मध्ये 52.47%, आदमपूर (हरियाणा) मध्ये 75.25%, अंधेरी ई (महाराष्ट्र) मध्ये 31.74%, धामनगर (ओडिशा) मध्ये 66.63%, गोला गोला गोरखनाथ (उत्तर प्रदेश) मध्ये 55.68% आणि मुनुगोडे (तेलंगणा) मध्ये 77.55% मतदान झाले.
आज सकाळी ७ वाजल्यापासून अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत फक्त २८.७७ टक्के मतदान झाले आहे. भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी माघारी घेतल्याने हा निरुत्साह दिसून आल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तेहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांच्या रॅलीवर गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार कुणी केला, हल्लेखोर कोण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
मला वाद करायचा नाहीये, काल आधी वाद मिटला म्हणाले, पण नंतर ते घरात घुसुन मारू म्हणाले, आज पुन्हा वाद मिटला म्हणतायतं. राणांच्या या विधानांमुळे गोंधळ निर्माण होतोय. यातुन काही साध्य होत नाही. म्हणून मी या गोंधळात पडायचं नाही असं ठरवलं आहे असे कडू यांनी सांगितलं. आमचा वाद संपला आहे असेही कडू म्हणाले आहेत.
भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. चित्रा वाघ यांची भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून यापूर्वी उमा खापरे यांनी भाजपच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. गेल्या काही दिवसापासून चित्रा वाघ या आक्रमकपणे महिलांचे प्रश्न मांडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून चित्रा वाघ यांच्या खांद्यावर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.
केईएम रुग्णालयाच्या कवॉटर्सचा छत कोसळून शिकाऊ नर्स जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज सकाळी 10:30 वाजता ही घटना घडली आहे. वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहेत. 49 वर्षीय नर्सच्या डोक्यावर स्लॅब कोसळल्याने डोक्याला मार लागला आहे. नर्सला उपचारासाठी रुग्णालयात त्वरित दाखल करण्यात आले होते. जखमी नर्सेचे नाव संगीता चव्हाण असून तिच्यावर सध्या केईएम रुग्णालयात सुरू करण्यात आले आहेत. नर्सची प्रकृती स्थिर असल्याचे समजते आहे.
लवकरच राज्यात ग्रामविकास विभागात वीस हजार पदांची भरती होणार असून याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरीची एक मर्यादा आहे. पद भरतीसाठी कोण आंदोलन करत असेल तर करू द्या असं चंद्रकांत पाटील म्हणलेत.
पुणे अहमदनगर रस्ता वरील असणाऱ्या वडगाव शेरी, सोपान नगर भागात एका गोदामाला भीषण आग लागल्याचा प्रकार घडला. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. हे गोदाम भंगार चे असल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील भंगार वस्तु आणि प्लास्टिक पेट घेत असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून मिळाली. या गोदामात सिलेंडर देखील ठेवले असावेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली आहे. यामध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्या आहेत. या निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत. 1 आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आणि 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीमध्ये ‘आप’देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
भारत जोडो यात्रेच्या समर्थनात पुण्यात बाईक रॅली होत आहे. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेसची बाईक रॅली निघणार आहे. कोथरूड ते आगाखाना पॅलेस पर्यंत काँग्रेसची बाईक रॅली निघणार आहे. बाईक रॅलीला माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील राहणार उपस्थित राहणार आहेत. ७ तारखेला भारत जोडो यात्रा नांदेड मध्ये दाखल होणार होणार आहे.
अंधेरी निवडणुकीत ऋतुजा लटकेच विजयी होतील असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंत 15 टक्के मतदान झाल्याची माहितीही अनिल परब यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाला मशाल चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणारी समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळून लावली आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघातील सर्व २५६ मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी ७ वाजतापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. यात सकाळी ११ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
कर्जत- नेरळ दरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. कर्जतहून मुंबईकडे निघालेल्या लोकलचा नेरळमद्धे खोळंबा झाला आहे. अप मार्गावर मालगाडी बंद पडल्यामुळे खोळंबा झाला आहे.
येत्या काही दिवसात एन डी ए चौकामध्ये सुशोभीकरण म्हणून विमान, रणगाडा, जहाज यांची प्रतिकृती उभारून त्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) यांचा स्तंभ उभारण्यात येईल. NDA चौकाच्या सुशोभीकरणासठी मंजुरी मिळाली असून येत्या २ महिन्यात हा चौक उभारण्यात येणार आहे. तसेच या चौकाला तिरंगा रंगामध्ये विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. चांदणी चौकातील काम ७० टक्के पूर्ण झाले असून येत्या जून पर्यंत सगळी कामं पूर्ण होतील असे नियोजन आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुजरात विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीमध्ये ‘आप’देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करू असा दावा राज्य सरकारकडून केला जात असतानाच धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या सहा महिन्यात 32 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. श्री. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
३. श्री. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)
५. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. श्री. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. श्री. राजेश त्रिपाठी (अपक्ष)
166 अंधेरी पूर्व या मतदार संघाची पोटनिवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया आज सकाळी 7 वाजता सुरू झाली. मतदान प्रक्रिया आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडी त्याचबरोबर महाराष्ट्राचं लक्ष्य लागून राहिलेली अंधेरी पोटनिवडणूक यासाठी आज मतदान होणार आहे या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.