पवई मेनगेट येथील तिरंदाज शाळेबाहेरील एका गाडीमध्ये तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला
घटना स्थळी पवई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालयात केला दाखल
पवई पोलीस या घटने बाबत पुढील चौकशी करत आहे
राज्यात सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थी अश्रूंनी निरोप देताना दिसत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील आसोंदा गावातही असाच हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग घडला.
प्राथमिक शाळेत गेल्या सात वर्षांपासून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर मायेचा ओलावा देणाऱ्या शिक्षिका कल्पना वानरे यांची बदली हिंगोली तालुक्यातील पेडगाव जिल्हा परिषद शाळेत झाली आहे.
याची बातमी समजताच गावभर शोककळा पसरली. चिमुकले विद्यार्थी कोपऱ्यात बसून हुंदके देत होते, मातांनी कल्पना मॅडमच्या गळ्याला पडून रडायला सुरुवात केली आणि गावातील वयोवृद्धांच्या डोळ्यांतही पाणी दाटलं.
एखादा जिवलग कायमचा परदेशी निघून गेल्याचे दुःख जणू या विद्यार्थ्यांना आणि पालकांना झालं होतं.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात बेनितुरा नदीला आलेल्या पूरपाण्यामुळे लातूर–कलबुर्गी महामार्गावर पाणी साचले आहे. यामुळे महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कसगी गावाजवळील पूल पाण्याखाली गेला असून, कलबुर्गी आणि धाराशिव जिल्ह्यांमधील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार प्रविण स्वामी यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी पुल परिसरात बंदोबस्त ठेवला असून, तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार स्वामी यांनी केली आहे.
जालन्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. जालन्यातील भाटेपूरी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कपाशी, सोयाबीनसह फळबागा धोक्यात आल्या आहेत. भाटेपूरी येथील शेतकरी राम आटोळे या शेतकऱ्याचं सहा एकर कपाशी पीक पावसामुळे जमीनदोस्त झालंय.
साताऱ्यातील कोयना धरण भरलं आहे. त्यामुळे विसर्ग वाढवण्यात आलं आहे.
नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील चाळीसगाव रोडवरील गिगाव फाटा परिसरात मालेगाव तालूका पोलिसांनी छापा टाकत अवैध गांजाची तस्करी करणा-या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्या कडून तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचा १५ किलो ३६१ ग्रॅम गांजा जप्त केलाय.
तळोजात घरात घुसून एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या नात्यातल्याच एका व्यक्तीने केल्याची माहिती आहे. तळोजा फेस-2 मध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 44 वर्षीय मोहम्मद आयुब साहिल याने आपल्याच नात्यातील एका 17 वर्षीय मुलीला भर दुपारी घरात घुसून तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केल्याचं समोर आलं आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून हे कृत्यू केलं असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
नवरात्रोत्सवात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील देवींची शक्तिस्थळे दर्शनासाठी पीएमपीएमएलकडून दोन विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीबरोबरच ग्रुप बुकिंगसाठी बससेवा उपलब्ध होणार आहे, या सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..
संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात, तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकसह काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय.
मेघगर्जनेसह पाऊस : रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव.
हलक्या ते मध्यम सरी : मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली
पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणातील तपासात आंदेकर टोळीच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर आले आहेत. पोलिसांनी बंडू आंदेकर व सहकाऱ्यांची तब्बल २७ बँक खाती गोठवली असून त्यांत ५० लाख ६६ हजार ९९९ रुपये असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी घरझडतीत कोट्यवधींचा ऐवज जप्त करण्यात आला होता. आरोपींच्या स्थावर मालमत्तेचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, वनराज आंदेकर खुनाच्या बदल्यासाठी टोळीने आंबेगाव पठार परिसरात रेकी केल्याचे उघड झाले असून संबंधित तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडे आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.