esakal Breaking News
esakal Breaking News 
देश

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

सकाळ डिजिटल टीम

दिल्लीमध्ये समविचारी पक्षांच्या बैठकीला सुरुवात

दिल्लीमध्ये विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. समविचारी पक्षांच्या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते दाखल झाले आहेत.

पुणे मेट्रो धावली रुबी हॉल स्थानकापर्यंत!

पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत! पुणेमेट्रोची सिव्हिल कोर्ट स्थानक ते रुबी हॉल स्थानक ही यशस्वी चाचणी घेण्यात आली.

काबूलमध्ये भीषण स्फोट, 2 जणांचा मृत्यू

अफगणिस्तानची राजधानी काबुलमध्ये भीषण स्फोट झाला आहे. काबुलमधील विदेश मंत्रालयाच्या रोडच्या ट्रेड सेंटरजवळ हा बॉम्बस्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. 

अमृता फडणवीस प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

अमृता फडणवीस प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर झाला आहे.

राज्यात सावरकर गौरव यात्रा काढणार- मुख्यमंत्री

राज्यात सावरकर गौरव यात्रा काढण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संकल्प जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या विधानाचा समाचार घेतला.

ऐन उन्हाळ्यात सामान्यांना वीज दरवाढीचा शॉक?

 सर्व सामान्यांना वीज दरवाढीचा मोठा शॉक बसण्याची शक्यता आहे. कारण आता नव्या आर्थिक वर्षात वीज नियामक मंडळ वीज दर निश्चितीबाबतचा नवा आदेश जारी करणार आहे. 

थोड्याच वेळात शिंदे-फडणवीस घेणार पत्रकार परिषद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत.

थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रपरिषद सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

आव्हाडजी, निवडणुकीत धूर दाखवू; शीतल म्हात्रेंचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल

स्त्रियांच्या चारित्र्यावर टिपण्णी करुन शांत करण्याची तुमची पद्धत सगळ्यांनाच माहिती आहे. बंद दाराआडच्या गोष्टीही सगळ्यांनाच ठाऊक आहेत टिपण्णी करताना आव्हाडजी विसरू नका, लेक तुमच्या घरातही आहे. बाकी निवडणुकीत धूर दाखवू, असा हल्लाबोल शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर केला.

गौतमीच्या मानधनामुळं तुमच्या पोटात का दुखतंय? तृप्ती देसाईंचा किर्तनकार इंदुरीकरांना सवाल

गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळं तुमच्या पोटात का दुखतंय? तृप्ती देसाई यांचा किर्तनकार इंदुरीकर यांना सवाल केला आहे. महिला आपल्यापुढं गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांनी गौतमी पाटीलवर टीका केल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे.

अतिक अहमद प्रकरणी सीएम योगींनी घेतली उच्चस्तरीय बैठक

अतिक अहमदला प्रयागराज इथं आणण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिकला प्रयागराज इथं आणल्यानंतर त्याचं पुढं काय होणार याबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, डीजीपी डीएस चौहान, मुख्य सचिव दुर्गा शंकर यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सामील होते, त्यांनी पुढील रणनीतीवर चर्चा केली.

कानपूर महामार्गावर अतिकचा ताफा पुन्हा थांबला

एकीकडं अतिक अहमदला झाशी सोडून जवळपास एक तास उलटून गेला आहे आणि तो उराईला पोहोचला आहे. तर, त्याचा भाऊ अश्रफ सीतापूर सीमेवर पोहोचला आहे. दीड ते दोन तासांत पोलीस अश्रफसह लखनौ सीमेवर दाखल होतील. अशरफला पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात प्रयागराजला नेण्यात आलं आहे.

राज्यसभा-लोकसभेचं कामकाज 4 वाजेपर्यंत तहकूब

संसदेचं अधिवेशन 2023 : विरोधी खासदारांच्या निदर्शनांदरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच गदारोळ झाला. राज्यसभेचं कामकाज आज दुपारी 2 वाजेपर्यंत तर लोकसभेचे कामकाज 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. अदानी समूहाच्या मुद्द्यावर आणि राहुल गांधींच्या अपात्रतेबाबत विरोधी पक्षाचे खासदार घोषणा देत होते.

साकीनाका परिसरातल्या हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग

मुंबईत पहाटे ३ वाजता साकीनाका परिसरातल्या हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली होती. अर्ध्या तासातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं होतं. मात्र, 5 वाजता पुन्हा आग वाढली. सध्या आग नियंत्रणात आहे, मात्र परिसरात मोठ्या प्रमाणात धूराचे लोट पसरले आहेत. दरम्यान आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

ईडी सरकारमुळं महाराष्ट्र कमजोर झालाय - आनंदराज आंबेडकर

राज्यात नव्यानं आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर 'ईडी सरकार' म्हणून सतत विरोधकांकडून टीका केली जात आहे. दरम्यान अशीच काही टीका आता रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकरांनी केली आहे. 'ईडी सरकारमुळे महाराष्ट्र कमजोर झालाय' अशा खोचक शब्दात आनंदराज आंबेडकरांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त परभणी येथे रिपब्लिकन सेनेचा स्वाभिमान मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.  

लातूर-गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांचा अपघात

किल्लारी : नातेवाईकांच्या परिवारातील मुलाचं पुण्यात लग्न समारंभ संपन्न करून गावी परतत असताना सकाळी लातूर गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गावर चलबुर्गा पाटी (ता. औसा जिल्हा लातूर) जवळ अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं वाहन पुलाखाली पलटी होऊन पडलं आहे.

पुण्यात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय बंद आंदोलन

पुण्यातील नामांकित स.प. महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे. निवेदन देवून देखील महाविद्यालयाच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच आहेत, यासाठी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात स.प. महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं.

पुण्यात मुंबईतील 'आरे'सारखा मुद्दा पेटणार?

पुण्यात होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या सहा हजार झाडांची कत्तल थांबवावी, यासाठी पुणे महानगर पालिकेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन सुरु आहे.

बिल्किस बानो प्रकरणी आज सुनावणी, दोषींच्या सुटकेविरोधात याचिका दाखल

बिल्किस बानो प्रकरणातील 11 दोषींची लवकर सुटका करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. 2002 च्या गुजरात दंगलीत 11 दोषींनी बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार करून तिच्या कुटुंबियांची हत्या केली होती. गुजरात सरकारनं 15 ऑगस्ट 2022 रोजी दोषींना दिलासा देत सुटका केली होती. याविरोधात बिल्किस बानो यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

औसा-निलंगा मार्गावर उत्का पाटीजवळ अपघात, 4 ठार

निलंगा : औसा ते निलंगा रस्त्यावर उत्का पाटीवर कार अपघातात ४ जण जागीच ठार झाले असून तिघे जखमी आहेत. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. निलंगा येथील रहिवासी सचिन बडूरकर (रा. दत्तनगर) हे परिवारासह पुणे येथून निलंग्याकडे येत होते. दरम्यान, कार रस्त्याच्या खाली उतरून पलटली. त्यात सचिन यांची दोन मुले, एक पुतण्या व एक मेव्हणा जागीच ठार झाले. तर सचिन बडूरकर , त्यांची पत्नी व मुलगी जखमी असून त्यांना लातूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अतिक अहमदचा एन्काउंटर होऊ शकतो; बहिणीनं व्यक्त केली भीती

अतिक अहमदच्या बहिणीनं भावाच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली आहे. अतिक अहमदच्या बहिणीनं सांगितलं की, कालच माझ्या भावानं त्याच्या एन्काउंटरबद्दल सांगितलं होतं. त्याची भीती बरोबर आहे. त्याचा एन्काउंटर होऊ शकतो. माझ्या भावाची प्रकृती ठीक नाहीये. तरीही त्याला साबरमती कारागृहातून प्रयागराजला आणलं जात आहे.

मुंबई : मुख्यमंत्र्यांना काहीच काम नाही. काल सदू आणि मधू भेटले, अशी टीका संजय राऊत यांनी राज ठाकरे-एकनाथ शिंदे भेटीवर केली आहे.

माजी महापौरांंचं नाव वापरून मागितली खंडणी

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव वापरून दोन जणांनी खंडणी मागितली आहे. पुण्यात भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या नावानं दोघांनी ही खंडणी मागितली. भारतीय युवा मोर्चाच्या कार्यक्रमासाठी ३ कोटी रुपये द्या म्हणून ही खंडणी मागण्यात आली. राजेश व्यास यांनी या संदर्भात कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संविधानात अल्पसंख्याकांना आरक्षण नाही - अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकच्या बिदरमध्ये (Karnataka Bidar) एका सभेला संबोधित करताना राज्यात धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्याबद्दल काँग्रेसवर (Congress) निशाणा साधला. याबाबत घटनेत कोणतीही तरतूद नसल्याचं ते म्हणाले. कर्नाटकातील भाजप सरकारनं (BJP Government) मुस्लिमांना दिलेलं चार टक्के आरक्षण हटवल्यानंतर अमित शाहांचं हे वक्तव्य समोर आलंय. एएनआयच्या वृत्तानुसार अमित शाह (Amit Shah) म्हणाले, अल्पसंख्याकांना देण्यात आलेलं आरक्षण संविधानानुसार नव्हतं. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची संविधानात कोणतीही तरतूद नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महिलांनी मारलं म्हणून 'त्यानं' खाणीत उडी मारून दिला जीव

महिलांनी मारलं आणि अपमान झाला म्हणून त्यानं खाणीत उडी मारून जीव दिला. पुण्यातील धाणोरी भागात दोन दिवसांपूर्वी खाणीमध्ये एका व्यक्तीनं उडी मारल्याची घटना घडली होती. त्याचं कारण आता समोर आलंय. अजय टिंगरे (४२) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार पोलिसांनी नवनाथ हनुमंत टिंगरे यासह ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सलमानला जिवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

चिठ्ठीनंतर मेलद्वारे दबंग अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धाकडराम बिष्णोई नावाच्या एका २१ वर्षांच्या तरुणाला मुंबई पोलिसांच्या एका विशेष पथकाने राजस्थान येथून अटक केली. तसेच त्याने सलमानप्रमाणे पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला यांच्या वडिलांनाही मेलद्वारे जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

मल्याळम अभिनेते इनोसंट यांचे निधन

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि माजी राज्यसभा खासदार इनोसंट यांचे कोची येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. इनोसंट यांना 3 मार्च रोजी कोची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

ट्युनिशियाच्या किनाऱ्यावर बोट उलटली; 28 प्रवाशांचा मृत्यू

ट्युनिस : ट्युनिशियाच्या किनारपट्टीवर (Tunisia Coast Boat Accident) एक मोठी दुर्घटना घडलीये. किनारपट्टीवर बोट उलटल्यामुळं किमान 28 प्रवासी मरण पावले, तर 60 हून अधिक बेपत्ता आहेत. इटालियन अधिकार्‍यांचा (Italian Officer) हवाला देत सीएनएननं वृत्त दिलंय की, हे स्थलांतरित भूमध्यसागर पार करून इटलीला जाण्याचा प्रयत्न करत होते.

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट आजपासून तीन दिवस बंद राहणार

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणनजीक परशुराम घाट आहे. हा घाट आजपासून दुपारी 12 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अवजड वाहतूक दिवसभर बंद राहणार आहे. 27 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत परशुराम घाट दिवसा वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

मुश्रीफांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात युक्तिवाद

मुंबई : हसन मुश्रीफ, त्यांची तिन्ही मुलं आणि सीएच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात आज युक्तिवाद होईल. ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. हसन मुश्रीफांना हायकोर्टानं दिलेलं अटकेपासूनचं संरक्षण या आठवड्यात संपतेय. त्यामुळं या याचिकेवर लवकरच निकाल अपेक्षित आहे.

स्वराज्य संघटना 2024 ची लोकसभा, विधानसभा निवडणूक लढणार - संभाजीराजे छत्रपती

संभाजीराजे  छत्रपती यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची पहिली जाहीर सभा काल (26 मार्च) नवी मुंबईतील कोपरखैरणे इथं पार पडली. बाईक रॅलीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ती शक्तिप्रदर्शन करत ही जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेदरम्यान छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी 2024 च्या सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी स्वराज्य संघटना देखील आता राजकीय पक्ष म्हणून समोर आली आहे.

LIVE Marathi News Updates : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळं त्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत. याशिवाय, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार आहे. काल मालेगावात उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली, त्यावर प्रतिक्रिया येऊ शकतात. त्याशिवाय, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावर जाणार असल्याचं कळतंय. तसेच देशभरासह विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. यासह राज्यातील विविध घडामोडींचा आढावा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT