Kalicharan Sakal
देश

कालीचरण महाराज अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

रायपूरच्या सेंट्रल जेलमधून कालीचरणला महाराष्ट्र पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुण्याला आणलं जात आहे.

रायपूर - छत्तीसगढमधील रायपुरमध्ये (Raipur) झालेल्या धर्मसंसदेत महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी यापूर्वीच अटक केलेल्या कालीचरण (Kalicharan) महाराज यास खडक पोलिसांनी (Khadak Police) बुधवारी सकाळी ताब्यात घेतले. त्यास दुपारी शिवाजीनगर (Shivajinagar) न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Pune Police Took Custody of Kalicharan)

समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे 19 डिसेंबर रोजी नातुबाग मैदानात शिवप्रतापदिन (अफझलखान वधाचा आनंदोत्सव) कार्यक्रमात आयोजित केला होता. या कार्यक्रमात समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी कालीचरण महाराज (रा. अकोला) याच्यासह समस्त हिंदू आघाडीचा कार्याध्यक्ष मिलींद रमाकांत एकबोटे, मोहनराव शेटे, दिपक बाबुलाल नागपुरे,कॅप्टन दिगेंद्रकुमार (रा. राजस्थान), नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. खडक पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई सदानंद ढगे यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

कालीचरण, एकबोटे यांनी कार्यक्रमात अन्य धर्माच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जातील. तसेच धार्मिक श्रध्दांचा अपमान करुन धार्मिक भावनांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे भाषण केले होते. दरम्यान, कालीचरण यास मध्यप्रदेश व छत्तीसगढ पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पुण्यात दाखल फिर्यादीवरुन कालीचरण यास खडक पोलिसांच्या पथकाने रायपुर येथून ताब्यात घेतले, अशी माहिती खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT