Ram-Temple 
देश

पाटण्यातील 'या' प्रसिद्ध मंदिरातर्फे राम मंदिरासाठी 10 कोटींची देणगी!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अनेक वर्षांपासून भारतीय ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहात होते, तो वाद गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने दीर्घकाळानंतर निकाली काढला. तो म्हणजे अयोध्येतील रामजन्मभूमीचा. 

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राम मंदिर उभारणीच्या हालचालींना वेग आला असून नुकतीच या मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी जाहीर करण्यात आली आहे. 

अयोध्येतील राम मंदिरासाठी पाटण्यातील प्रसिद्ध महावीर मंदिर न्यासाने दहा कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे. न्यासाचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

''अयोध्येत राम मंदिर व्हावे, ही आमची अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे. त्यामुळे त्यासाठी आम्ही दहा कोटी रुपयांचा निधी आधीच काढून ठेवला आहे. राम मंदिराचे बांधकाम सुरू होताच हा निधी तत्काळ मंदिर समितीला दिला जाईल,'' असे आचार्य किशोर कुणाल यांनी स्पष्ट केले. 

''पंतप्रधानांनी राम मंदिरासाठी ट्रस्टची घोषणा केली, ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. आम्ही या घोषणेचे स्वागत करतो. या ट्रस्टला पूर्णपणे स्वायत्तता देण्यात आलेली आहे. त्यामुळे राम मंदिराबाबत कोणताही निर्णय घेण्यास समितीला अडचण येणार नाही,'' असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील ५ दिवस जोरदार पाऊस; 'या' भागांत रेड अलर्ट जारी, तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

ढिंग टांग : जोनाथनचा सल्ला..!

Dibba Roti Recipe: बाहेरून क्रिस्पी, आतून स्पंजी! दक्षिण भारताची ही डिब्बा रोटी एकदा नक्की ट्राय करा; चव अशी की पुन्हा बनवाल

इनर इंजिनिअरिंग ; ध्यान : स्वतःला सैल करण्यासाठी

अस्थिबोध : स्लिप डिस्क म्हणजे काय?

SCROLL FOR NEXT