Anand Mahindra  Team eSakal
देश

महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरव

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.

सुधीर काकडे

राष्ट्रपती भवनात आज पद्म पुरस्कारांच्या वितरणाचा सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वेगवेळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११९ जणांना पद्म पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आनंद महिद्रा हे नेहमी आपल्या वेगवेळ्या कामांमुळे चर्चेत असतात. महिंद्रा समुहाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक कार्य देखील केली आहेत. तसेच वेगवेळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या कामाचा सन्मान करण्यासाठी ते महिंद्रा समूहाचं वाहन भेट देऊन चांगल्या कामासाठी उत्तेजित करत असतात. त्यामुळेच आज त्यांना या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील लोकांच्या 'उत्कृष्ट कार्य किंवा योगदानाचा सन्मान करण्यात येतो. हे पुरस्कार विशिष्ट कामगिरी, वेगवेळ्या क्षेत्रातील सेवा, कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय, सामाजिक , विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक कार्य, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग इत्यादी क्षेत्रातील योगदानासाठी दिले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रेकिंग : वैभव सूर्यवंशीसोबत धक्काबुक्की... खेळाडूंवर कारवाई, भारताच्या युवा फलंदाजाला कोणती शिक्षा मिळाली?

Comrades Marathon : पुण्याच्या धावपटूंचा दक्षिण अफ्रिकेत डंका! योगेश सानप यांचा ‘कॉम्रेड्स’ मॅरेथॉनमध्ये भारतीय राष्ट्रीय विक्रम

Pune Fraud News : गृहप्रकल्पाच्या नावाखाली ५० कोटींची फसवणूक! व्यापारी व निवासी सदनिका देण्याचे आमिष; बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा

Pune Fire : पत्रावळ्यांच्या कारखान्याला भीषण आग; शेजारील क्लिनिक, चार सदनिकांसह टाईल्सचे गोदाम खाक

Pune News : अर्थव्‍यवस्‍थेचा विकास हा आकड्यांचा खेळ; माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांची टीका

SCROLL FOR NEXT