Mahua Moitra sakal
देश

Mahua Moitra : संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपाचा सामना करणाऱ्या; मोईत्रांना २ नोव्हेंबरला हजर व्हावे लागणार

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी खासदार मोईत्रा यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप केले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपाचा सामना करणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेच्या शिस्तपालन समितीसमोर येत्या २ नोव्हेंबरला हजर राहावे लागणार आहे. दरम्यान, व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांना लोकसभेच्या संकेतस्थळाचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिल्याचे आज महुआ मोईत्रा यांनी मान्य केले.

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी खासदार मोईत्रा यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप केले आहेत. अदानीसंदर्भात प्रश्न विचारण्यासाठी खासदार मोईत्रा यांनी पैसे तसेच मौल्यवान भेटवस्तू घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मुंबईतील बांधकाम व्यावसायिक हिरानंदानी यांनी मोईत्रा यांचे लोकसभेचे लॉगिनचा वापर करत लोकसभा सचिवालयाकडे प्रश्न पाठविल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत खासदार निशिकांत दुबे व बांधकाम व्यावसायिक हिरानंदानी यांचे जवाब नोंदविण्यात आले आहेत.

मोईत्रा यांनी चार नोव्हेंबरला हजर होण्याची विनंती केली होती. परंतु खासदार विनोद सोनकर अध्यक्ष असलेल्या समितीने मोईत्रा यांची ही विनंती अमान्य करीत दोन नोव्हेंबरला समितीसमोर आपला जवाब नोंदवावा, असे निर्देश दिले आहेत.

लॉगिन दिल्याचे मान्य

मोईत्रा यांनी आज हिरानंदानी यांना लॉगिन पासवर्ड दिल्याचे मान्य केले. त्या म्हणाल्या, ‘‘दर्शन हिरानंदानी यांच्या कार्यालयातील एक व्यक्ती प्रश्‍न टाइप करायचा आणि तो आपण लोकसभेच्या संकेतस्थळावर टाकत होतो. प्रश्‍न टाइप केल्यानंतर त्यांचा फोन यायचा.

आपण मतदारसंघात सतत व्यग्र असल्याने हे प्रश्‍न मी एकदाच वाचायचे. हा प्रश्‍न टाइप केल्यानंतर मला मोबाईलवर ओटीपी यायचा आणि मी त्यांना ओटीपी द्यायचे. त्यानंतर प्रश्‍न दाखल व्हायचा. ’’ दर्शन हिरानंदानी हे लोकसभेचे लॉग इन आणि पासवर्ड वापरायचे व स्वत:च प्रश्‍न अपलोड करायचे, असा आरोप करणे हास्यास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT