Mahua Moitra Krishnanagar Lok Sabaha Result  Esakal
देश

Krishnanagar Lok Sabaha Result: डॅशिंग महुआ मोईत्रा संसदेत पुन्हा गरजणार, कृष्णनगरमधून मिळवला दमदार विजय

Mahua Moitra: महुआ मोइत्रा यांची गेल्या वर्षी एका कथित 'कॅश फॉर क्वेरी' घोटाळ्यात लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

आशुतोष मसगौंडे

कृष्णनगर लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम बंगालमधील चर्चेत असलेल्या जागांपैकी एक आहे कारण तृणमूल काँग्रेसच्या निलंबित खासदार महुआ मोईत्रा या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवत होते. त्यांची लढत भाजपच्या अमृता रॉय यांच्याशी होती. त्यामध्ये मोइत्रा यांनी विजय मिळवला आहे. मोइत्रा यांना 56605 मतांनी विजय मिळवला आहे.

आज सुरू असलेल्या मतमोजणीत निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, तृणमूलच्या उमेदवार महुआ मोईत्रा कृष्णनगरमध्ये भाजपच्या उमेदवार राजमाता कृष्णा राय यांना मागे टाकत ५२९३७ मतांनी आघाडीवर आहेत. सध्या मतमोजणी सुरू आहे.

महुआ मोइत्रा यांची गेल्या वर्षी एका कथित 'कॅश फॉर क्वेरी' घोटाळ्यात लोकसभेतून हकालपट्टी करण्यात आली होती. 2019 मध्ये त्यांनी ज्या जागेवर विजय मिळवला होता त्याच जागेवरून पुन्हा एकदा संसदेत प्रवेश करण्याची संधी TMC ने दिली आहे.

मतदारसंघात कोणाची ताकद?

कृष्णनगर लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम बंगालच्या 42 लोकसभा जागांपैकी एक आहे. कृष्णनगरमध्ये सात विधानसभा जागांचा समावेश होतो: तेहट्टा, पलाशीपारा, कालीगंज, नक्षीपारा, छपरा, कृष्णनगर उत्तर, शांतीपूर आणि नबद्वीप. ऐतिहासिकदृष्ट्या, तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (मार्क्सवादी) गड मानला जात असे. 1967 मध्ये चौथ्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्थापन झालेल्या या मतदारसंघात 2014 पर्यंत 13 लोकसभा निवडणुका झाल्या आहेत, ज्यामध्ये CPI(M) नऊ वेळा विजयी झाले आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीतील येथील 7 जागांपैकी 6 जागांवर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली होती. तर कृष्णनगर शहर उत्तरमध्ये भाजपचा उमेदवार निवडणून आला होता.

2019 मध्ये कोण जिंकले?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कृष्णनगर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसने (TMC) महुआ मोईत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. झा शंतनू हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून (सीपीआय-एम), इंताज अली शाह काँग्रेसकडून आणि कल्याण चौबे हे भाजपकडून निवडणूक लढवत होते.

2019 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या (TMC) महुआ मोईत्रा यांनी ही जागा जिंकली, त्यांना 6,14,872 (45 टक्के) मते मिळाली. तर भाजपचे कल्याण चौबे यांना 5,51,654 (40.37 टक्के) मते मिळाली.

स्थानिक समस्या

अलीकडच्या काळात भाजप आणि तृणमूलमधील राजकीय संघर्ष चर्चेत आहे. रोजगाराचा अभाव आणि पायाभूत सुविधांचा विकास हा अजूनही एक मुद्दा आहे.

हा भाग प्रामुख्याने शेतीप्रधान आहे, तर काही देशांतर्गत उद्योगही गेल्या काही वर्षांत येथे विकसित झाले आहेत.

विकासाशी संबंधित कामांसाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, त्यापैकी 86.41 टक्के निधीचा वापर झाला आहे. परिसरातील विकासाची स्थिती सरासरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT