mahua moitra 
देश

'दो पैसेवाली मीडिया' वक्तव्यावर महुआ मोइत्रांचा घुमजाव; माफी मागूनही वक्तव्यावर ठाम

सकाळवृत्तसेवा

कोलकाता : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी मीडियासंदर्भातील केलेलं एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी माध्यमांवार टीका करताना 'दो पैसेवाली मीडिया' असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्याबद्दल कोलकाता प्रेस क्लबने मोइत्रा यांना माफी मागण्यास सांगितलं होतं. मात्र, यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी म्हटलंय की, ही एक बंद खोलीतील बैठक होती, म्हणून त्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं की इथे प्रेसला का बोलवलं गेलं आहे? 

मोइत्रा यांनी यासंदर्भात ट्विटरवर एका बाजूला माफी मागितली असली तरीही दुसऱ्या बाजूला स्वत:ला बरोबर ठरवलं आहे. आपल्या स्पष्टीकरणात मोइत्रा यांनी म्हटलंय की, जिल्हा युनिटच्या एका विभागाने रिपोर्टर्सना एका बंद खोलीतील बैठकीसाठी बोलवले होते. नुकत्याच पक्षात झालेल्या संघटनात्मक बदलांमुळे हा गट नाराज होता. येथे पत्रकारांना का बोलविण्यात आले आहे, याबद्दल मला कार्यकर्त्यांवर नाराजी होती.
प्रेस क्लबच्या नाराजीवर त्यांनी म्हटलंय की, प्रेस क्लबला याऐवजी पत्रकारांना ट्रेनिंग द्यायला हवी. मोबाईल फोन हातात घेतलेला प्रत्येक व्यक्ती पत्रकार होत नसतो. ही एक बंद खोलीतील बैठक होती. तसेच मी आमच्या कार्यकर्त्यांना देखील फोन ठेवण्याची परवानगी दिलेली नव्हती.  

हेही वाचा - कोरोना लशीच्या आढाव्यासाठी 64 देशांचे प्रतिनिधी भारत दौऱ्यावर
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मोइत्रा या पक्ष कार्यकर्त्यांवर नाराज होताना दिसत आहेत. त्या या व्हिडीओत म्हणताना दिसतात की, किसने यहां दो पोइसर वाली प्रेस को बुलाया है? यांना या कार्यक्रम स्थळावरून हटवण्यात यावं. प्रेस क्लबने मात्र मोइत्रा यांच्या या वक्तव्याचा निषेध करत ते मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलंय की, त्यांचं हे वक्तव्य निसंशय अनुचित तसेच अपमानकारक आहे. कारण लोकशाहीमध्ये एका पत्रकाराचे महत्त्व आणि त्याच्या पेशाप्रती सन्मान राखला गेला पाहिजे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

खासदार ओमराजे निंबाळकरांना मोठा दिलासा, 'तो' गुन्हा रद्द; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

NSE IPO: देशातील सर्वात मोठा IPO खुला! 14 हजारांच्या गुंतवणुकीवर किती फायदा? कधी होणार लिस्टिंग? जाणून घ्या सर्व

Bijli Tigress: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वाघीण 'बिजली'चा मृत्यू

Gauri Avahan 2026: गौराई घरात घेताना माप ओलांडणं का महत्त्वाचं? सांडलेल्या धान्याचंही आहे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT