mine collapse in Mizoram esakal
देश

Mizoram Mine Collapse : मिझोराममध्ये मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना! खाण कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू, मदत आणि बचावकार्य सुरू

Mizoram Mine Collapse: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी परिसरात सतत पाऊस पडत असताना हा अपघात झाला. पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणेकडून बचावकार्य सुरू आहे.

Sandip Kapde

Mizoram Mine Collapse :

मिझोरामची राजधानी आयझॉलच्या जवळ मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे एक खाण कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत या घटनेत 10 कामगारांना जीव गमवावा लागला. आणखी काही लोक अडकले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पोलीस आणि इतर प्रशासकीय यंत्रणेकडून बचावकार्य सुरू आहे. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत असून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी परिसरात सतत पाऊस पडत असताना हा अपघात झाला. पोलिसांनी सांगितले की, ही घटना सकाळी 6 च्या सुमारास आयझॉल शहराच्या दक्षिणेकडील सीमेवर असलेल्या मेल्थम आणि हॅलिमेन दरम्यानच्या भागात घडली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यावर परिणाम होत आहे.

अनेक ठिकाणी भूस्खलन झाले

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलनही झाले आहे. हुंथरमधील राष्ट्रीय महामार्ग 6 वर भूस्खलन झाले. याशिवाय अनेक आंतरराज्य महामार्गांनाही भूस्खलनाचा फटका बसला आहे.

पावसामुळे सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून अत्यावश्यक सेवा देणारे वगळता सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे. आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT