Accident News Esakal
देश

Accident News: भरधाव जाणाऱ्या रिक्षाने मेट्रो क्रेनला दिली धडक अन्...., भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू

Accident News: राजधानी पाटणा येथे एक मोठी दुर्घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या रिक्षाची मेट्रो क्रेनला धडक बसली. ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Accident News: भरधाव जाणाऱ्या रिक्षाने मेट्रो क्रेनला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. पाटण्यात ही दुर्घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेल्या रिक्षाची मेट्रो क्रेनला धडक बसली. ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

राजधानी पाटणा येथे एक मोठी दुर्घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या रिक्षाची मेट्रो क्रेनला धडक बसली. ज्यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. नवीन बायपास परिसरातील रामलखन पथावर ही घटना घडली आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. सर्व मृतदेह पीएमसीएच येथे पाठवण्यात आले आहेत. हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. स्थानिक आणि प्रवासी यावेळी मदतीला धावले. या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारांसाठी रूग्णालयाच दाखल करण्यात आलं आहे. मृतांमध्ये ज्या लोकांची ओळख पटली आहे.

त्यात उपेंद्र कुमार, लछमन दास, अभिनंदन कुमार, इंद्रजित कुमार, पिंकी देवी, नेहा प्रियदर्शी आणि राणी कुमारी यांचा समावेश आहे. मोतिहारी रहिवासी मुकेशकुमार साहनी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पत्नी पिंकी देवी, मुलगा अभिनंदन आणि मुलगी राणी कुमारी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: न्यूझीलंडने इंग्लंडला १६० धावांनी चिरडले, कसोटी मालिका २-१ ने खिशात

Maharashtra politics: मोठी राजकीय घडामोड! विरोधकांनी म्यान केल्या तलवारी; आमदार संजना जाधव यांना बिनशर्त पाठिंबा, कन्नड डीसीसी बँक निवडणुकीत ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : उत्तर प्रदेशातील कासगंज येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं, पायलट जखमी

Pune Death Penalty: पुण्यातील फाशीच्या शिक्षांचा इतिहास; गाजलेल्या गुन्ह्यांपासून नसरापूर प्रकरणापर्यंत कठोर न्यायाची परंपरा

Bhambavli Vajrai Waterfall : भारतातील सर्वात उंच धबधबा पर्यटकांसाठी सज्ज! वजराई धबधब्याचे 'अक्राळविक्राळ' रूप पाहण्यासाठी देश-विदेशातून उत्सुकता, हंगामाची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT