esakal

देश

Bus Accident News : भीषण अपघात! भाविकांची बस थेट दरीत कोसळली, ९ जणांचा मृत्यू; अनेक गंभीर जखमी

Devotees' bus falls into gorge :जाणून घ्या, कुठे घडला हा भीषण अपघात? , मृतांचा आकडा वाढण्याची भीती, बसमध्ये ३० हून अधिक लोक होते.

Mayur Ratnaparkhe

Andhra Pradesh Bus Accident : आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला आहे. घाट रस्त्यावरून भाविकांना घेऊन जाणारी बस नियंत्रणाबाहे जाऊन थेट दरीत कोसळली. या अपघातात आतापर्यंत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. 

जखमींना उपचारासाठी तातडीने भद्रचलम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो, कारण अनेक प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील ही बस भद्रचलमहून अन्नावरमला जात होती. चित्तूर-मरेदुमिल्ली घाट रस्त्यावर हा अपघात झाला.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अल्लुरी जिल्ह्यातील चिंतूर मंडळातील तुलसीपाकालू घाट रोडवर झालेल्या बस अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तर  जिल्हाधिकारी दिनेश कुमार यांनी सांगितले की, अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात काल रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली जेव्हा एक खासगी ट्रॅव्हलर बस नियंत्रण गमावून चित्तूर-मरेदुमिल्ली घाट रस्त्यावर खोल दरीत कोसळली. या अपघातात नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. बसमध्ये ३० हून अधिक प्रवासी होते.

बस तेलंगणातील भद्राचलमहून अन्नावरमकडे जात असताना अपघात झाला. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना भद्राचलम एरिया हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, कारण काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT