Makar Sankranti sakal
देश

Makar Sankranti : पतंग उडवल्यास खावी लागेल जेलची हवा; वाचा काय सांगतो कायदा

मकर संक्रांतीला संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात.

सकाळ डिजिटल टीम

Law For Kite Flying On Makar Sankranti : भारतात पतंग उडवणे बेकायदेशीर आहे. असे कुणी सांगितले तर, तुम्ही त्या व्यक्तीला वेड्यात काढाल. ()

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

त्यात अवघ्या काही दिवसांवर मकर संक्रांतीचा सण आहे. या दिवशी संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. मात्र, संक्रांतीला पतंग उडवण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक आहे. असे न केल्यास हा गुन्हा मानला जातो. आज आम्ही नेमका हा कायदा काय आहे? याबद्दल माहिती सांगणार आहोत.

कोणत्या कायद्यानुसार मानला जातो गुन्हा

परवानगीशिवाय भारतात पतंग उडवणे हा भारतीय विमान कायदा 1934 नुसार गुन्हा आहे, कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीला 2 वर्षांपर्यंत कारावास किंवा दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

भारतीय विमान कायदा 1934 नुसार, जर कोणतीही व्यक्ती आकाशात पतंग, फुगा किंवा ड्रोनसारख्या वस्तू उडवत असेल, तर त्यासाठी सर्वात प्रथम सरकारची परवानगी किंवा परवाना घेणे आवश्यक आहे.

पंतग किंवा तत्सम तुम्ही हवेत उडवत असणाऱ्या गोष्टीमुळे जमिनीवर, आकाशात जीवित, मालमत्तेची हानी होऊ शकते, असे सिद्ध झाल्यास आणि यासाठी तुम्ही जबाबदार असल्यास. या कायद्यानुसार शिक्षेची तसेच दंडाची तरतुद आहे.

पतंगबाजीवर बंदी घालण्याची मागणी

दरम्यान, पतंगाच्या मांज्यामुळे यापूर्वी अनेक पक्षांचा मृत्यू आणि वाहनचालकांचा अपघात झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या किंवा पाहिल्या आहेत.

काही वर्षांपूर्वी अलाहाबादमध्ये एका घटनेत एक महिला स्कूटीवरून जात असताना अचानक पतंगाचा धागा तिच्या गळ्यात अडकल्याने महिलेचा गळा कापला गेला होता.

मांजामुळे वाढत्या अपघातांच्या घटनांनंतर अनेक स्वयंसेवी संस्थांकडून पंतगबाजीवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

पीएम मोदी आणि सलमान खानही आहेत पतंगाचे फॅन

भारतात पतंग उडवणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुपरस्टार सलमान खान यांचाही समावेश आहे.

काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खान एकत्र पतंग उडवताना दिसले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Pakistan Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान आशिया कप लढत! रेकॉर्ड्स, स्टॅट्स आणि संभाव्य विजेता कोण?

मोठी बातमी! विभक्त रेशनकार्डधारक सूना ‘लाडकी बहीण’साठी पात्र; पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, पण ४ लाखांवर लाभार्थी पत्त्यावर सापडल्याच नाहीत

आजचे राशिभविष्य - 14 सप्टेंबर 2025

साप्ताहिक राशिभविष्य : (१४ सप्टेंबर २०२५ ते १९ सप्टेंबर २०२५)

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT