Swati Maliwal  sakal
देश

Swati Maliwal : ‘आप’च्या अडचणी वाढल्या;बेदम मारहाण झाल्याचा मालिवाल यांचा आरोप

राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय्य साहाय्यक विभव कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ‘मला बेदम मारहाण करण्यात आली’ असे स्वाती मालिवाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय्य साहाय्यक विभव कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ‘मला बेदम मारहाण करण्यात आली’ असे स्वाती मालिवाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मुख्यमंत्री निवासस्थानी असलेल्या सीसीटिव्ही फुटेजची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या नोटिशीला विभव कुमार यांनी उत्तर न दिल्याने आयोगाने पुन्हा त्यांना नोटीस बजावली असल्याने हे प्रकरण आता आणखी तापले आहे.

दिल्ली पोलिसांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल दुपारी स्वाती मालिवाल यांचा जबाब नोंदवून घेऊन काल सायंकाळी उशिरा गुन्हा नोंदविला. तसेच, स्वाती मालिवाल यांची अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

दरम्यान, यामध्ये स्वाती मालिवाल यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीच्या तपशिलांवरून जोरदार खळबळ उडाली. मालिवाल यांच्या अडीच पानी तक्रारीमध्ये १३ मे रोजी झालेल्या घटनाक्रमाचा उल्लेख करताना, विभवकुमारने आपल्याला शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली, पोटात लाथ मारली तसेच शरीराच्या नाजूक अवयवांवरही विभव कुमारने प्रहार केला, असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे या घटनेची माहिती ११२ क्रमांकावर दूरध्वनी करून पोलिसांना दिल्याचाही उल्लेख मालिवाल यांच्या तक्रारीत आहे. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने मालिवाल प्रकरणात दिल्ली पोलिसांचा कृती अहवाल आणि नोंदविलेल्या गुन्ह्याची तपशीलवार माहिती मिळाल्याचे स्पष्ट केले.

मालिवाल यांच्या व्हिडिओमुळे खळबळ

मालिवाल यांना झालेल्या मारहाणीच्या घटनाक्रमानंतरचा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल या सोफ्यावर बसलेल्या असल्याचे आणि त्यांना सुरक्षा कर्मचारी बाहेर जाण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. तर, स्वाती मालिवाल संतप्त स्वरात या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपण बाहेर जाणार नसल्याचे आणि पोलिस उपायुक्तांशी बोलणार असल्याचे म्हणत आहेत.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्वाती मालिवाल यांनी समाज माध्यमावरून आपली नाराजी व्यक्त केली. “राजकीय हिटमॅनने नेहमीप्रमाणे स्वतःला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या लोकांना समाज माध्यमांवर पोस्ट करायला सांगून आणि संदर्भरहित व्हिडिओ प्रसारित करून या गुन्ह्यातून स्वतःला वाचविता येईल, असे त्याला वाटते आहे.

या निवासस्थानातील आणि त्या दालनातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी झाल्यास वस्तुस्थिती समोर येईल. एक ना एक दिवस सर्व सत्य बाहेर येईल”, असे मालिवाल म्हणाल्या. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री निवासस्थानी जाऊन तपासणीही केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Sugar Season : महाराष्ट्राचा ऊस पळवण्यासाठी कर्नाटक सरकारचा नवा डाव, कर्नाटकात साखर कारखाने सुरू...

IND vs AUS 1st ODI Live: २५ धावांत ३ विकेट्स! विराट कोहलीला 'गंडवलं', भोपळ्यावर माघारी पाठवलं; शुभमन गिलही परतला Video

Beed News : छातीत लागली गोळी, रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; बीडमध्ये खळबळ

Kolhapur Sex Worker : कोल्हापुरात एकाच वेळी सहा महिलांनी नस कापून घेतली, प्रकरणातील नवी अपडेट समोर

Diwali 2025: दिवाळीत पाण्यावरचे दिवे मुलांसाठी धोकादायक, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितले?

SCROLL FOR NEXT