Mallikarjun Kharge esakal
देश

Hathras Stampede : महाराष्ट्राच्या धर्तीवर अंद्धश्रद्धा निर्मूलनासाठी केंद्राने कायदा करावा; खरगेंची राज्यसभेत मागणी

Hathras Stampede : हाथरसमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांना आज राज्यसभेत मौन श्रद्धांजली वाहण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात ज्या प्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करण्यात आला आहे, त्या धर्तीवर केंद्र सरकारने लोकांना अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यापासून वाचविण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज राज्यसभेत केली.

आज राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हाथरसच्या मृतांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर बोलताना विरोधी पक्षनेते खर्गे म्हणाले, ‘‘कुणी भोंदू बाबा लोकांना जमा करतो. त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था राहत नाही. त्यामुळे अनेकदा निरपराध लोकांना जीव गमवावा लागतो. हाथरसमधील घटना हे त्याचेच उदाहरण आहे. अनेक भोंदू बाबा तर आज तुरुंगात आहेत. या भोंदू बाबांवर कारवाई होण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारने यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला आहे. या धर्तीवर केंद्र सरकारने कायदा करून लोकांना अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यापासून वाचवावे’’, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

हाथरसमधील मृतांना श्रद्धांजली

हाथरसमध्ये एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत पावलेल्यांना आज राज्यसभेत मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. अशा घटना घडू नये, यासाठी केंद्र सरकारने उपाययोना कराव्या, असे निर्देशही सभापती धनखड यांनी केंद्र सरकारला दिले.

संसद संस्थगित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यसभेतील भाषणानंतर संसदेचे विशेष अधिवेशन संस्थगित करण्यात आले. लोकसभेचे कामकाज मंगळवारला संपविण्यात आले. परंतु राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावरील चर्चेला पंतप्रधान मोदी यांचे उत्तर आज राज्यसभेत झाल्यानंतर त्यानंतर हे अधिवेशन संस्थगित करण्यात आल्याची घोषणा सभापती जगदीप धनखड यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

धावती लोकल पकडायला गेला, अचानक तोल जाऊन ट्रेनखाली येणार इतक्यात...; RPF जवानांनी तरुणाला दिले जीवनदान, Video Viral

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT