Adhir Ranjan Chowdhury 
देश

Adhir Ranjan Chowdhury: नीरव मोदी म्हणजे शांत मोदी! काँग्रेसचा संसदेत बचाव

Sandip Kapde

Adhir Ranjan Chowdhury: काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे. विशेषाधिकार समिती त्यांच्या विरोधात अहवाल सादर करेपर्यंत अधीर रंजन यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे.  हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे प्रलंबित आहे. याप्रकरणी समिती चौकशी अहवाल सादर करणार आहे. तोपर्यंत अधीर रंजन यांना सदनातून निलंबित करण्यात येणार आहे.

भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला, तो संसदेत मान्य करण्यात आला. प्रल्हाद जोशी यांनी अधीर रंजन चौधरी यांच्यावर संसदीय कामकाजात सतत व्यत्यय आणण्याचा आणि देशाची व प्रतिमेची बदनामी केल्याचा आरोप केला.

दरम्यान अधीर रंजन चौधरी यांच्या बचावासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत उत्तर दिले आहे. नीरव म्हणजे शांतता, असे खर्गे म्हणाले.

नीरव म्हणजे शांत आणि मोदी शांत असतात म्हणून त्यांना नीरव मोदी असे संबोधलं. मोदी यांना शांत म्हटल्यामुळे अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन का करण्यात आले, अस प्रश्न मल्लिकार्जुन खर्गे यांनी सभापतींना विचारला.

लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर अधीर रंजन यांनीही तीच टीका केली ज्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. ते म्हणाले होते की, माझा उद्देश पंतप्रधानांचा अनादर करण्याचा नव्हता. मी धृतराष्ट्र-द्रौपदीचे उदाहरण दिले होते. (Latest marathi news)

भाजपचा एक उंच खासदार माझ्यावर हल्ला करण्यासाठी आला होता. मी कोणतीही तक्रार केली नाही. ते राजकारण करत आहेत. मी कोणताही चुकीचा शब्द बोललो नाही. एखाद्या घटना तज्ज्ञाला विचारा, अधीर रंजन चौधरी म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT