mallikarjun Kharge and nirmala sitharaman 
देश

केवळ विधाने चालणार नाहीत; सीतारामन यांच्या 'त्या' विधानाचा खर्गेंनी घेतला समाचार

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या सातत्याने होत असलेल्या घसरणीवरून काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. घसरलेला रुपया आपल्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतो, असंही ते म्हणाले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, रुपया कमकुवत होत नाहीये, डॉलर मजबूत होत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना खरगे म्हणाले की, केवळ घोषणा आणि वक्तव्य करून चालणार नाही, केंद्र सरकारला रुपयाची घसरण रोखण्यासाठी लवकर ठोस पावले उचलावी लागतील.

खरगे यांनीही आपल्या ट्विटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, आता केवळ वक्तव्ये चालणार नाहीत. अर्थमंत्री सीतारामन यांनी 16 ऑक्टोबर रोजी म्हटलं होतं की, इतर चलनांपेक्षा रुपयाने चांगली कामगिरी केली आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे हे झाले आहे. 'रुपयातील घसरण म्हणून आपण याकडे पाहात नसून डॉलरची सततची मजबूती म्हणून पाहतोय. अर्थमंत्र्यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषदेत हे विधान केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : महाडमध्ये केमिकल कंपनीत गॅस गळतीमुळे एकाचा मृत्यू, ८ गंभीर

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT