Mamata_Banerjee 
देश

West Bengal Assembly Election: ममतांवर हल्ला करणाऱ्यांविषयी सस्पेन्स वाढला

पीटीआय

West Bengal Assembly Election 2021: कोलकाता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील कथित हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. तृणमूल काँग्रेसने याच घटनेचे भांडवल करायला सुरुवात केली असताना भाजपनेही त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारने याबाबत निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर केला होता पण त्यामध्येही या घटनेची जुजबी माहिती देण्यात आल्याने आयोगाने नाराजी व्यक्ती केली आहे. मुख्य सचिव अल्पान बंदोपाध्याय यांनी याबाबत सविस्तर निवेदन सादर करावे, असे निर्देश निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

ही घटना नेमकी कशी घडली आणि त्यामागे नेमके कोण सूत्रधार होते याबाबत सविस्तर माहिती द्या, असे निर्देश आयोगाने मुख्य सचिवांना दिले आहेत. ममता बॅनर्जींवर हल्ला करण्यामागे नेमका कुणाचा हात असू शकतो, याबाबत देखील माहिती सादर करा असेही या निर्देशांत म्हटले आहे. 

राज्य सरकारने आयोगाला सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, ‘‘ममतांवर शुक्रवारी सायंकाळी हल्ला झाला तेव्हा प्रचंड गर्दी होती.’’ ज्या चार ते पाच व्यक्तींनी ममतांवर हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे, त्यांचा या अहवालामध्ये कोठेही स्पष्ट उल्लेख दिसत नाही. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राम येथील बिरूलिया बाजार परिसरात सायंकाळी ममतांवर हा कथित हल्ला करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागितला होता.

हल्ला करणाऱ्यांविषयी सस्पेन्स 
ममता नंदीग्राममधून निवडणूक लढवत असून त्यांना भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचे आव्हान आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांकडून महत्त्वाच्या राजकीय खेळी खेळल्या जात आहेत. यादरम्यान ममतांवर झालेला हल्ला हा अपघात होता की कट याबाबत अजून काही स्पष्ट झाले नाही. ममतांवर हल्ला करणाऱ्या त्या चार-पाच व्यक्ती अहवालातून गायब झाल्या आहेत.

पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी ममतांवर झालेल्या हल्ल्याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला, पण त्यामध्ये चार-पाच जणांनी हल्ला केल्याच्या कोणत्याही माहितीचा उल्लेख करण्यात आलेल नाहीय. याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ममतांवर शुक्रवारी सायंकाळी हल्ला झाला तेव्हा प्रचंड गर्दी होती, फक्त एवढाच उल्लेख करण्यात आला आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cow E-attendance: गायींनाही आता ई-अटेंडन्स द्यावा लागणार! एक विशेष मायक्रोचिप विकसित; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

वाहतुकीचा ‘नवा अध्याय’ लिहिला जाणार! गोरेगाव-मुलुंड लिंक रोडमुळे कोंडीतून दिलासा मिळणार! नवी मुंबई काही मिनिटांत गाठता येणार!

Mangalwedha News: मंगळवेढा शहरातील अनेक प्रश्न रखडले; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

Vasudev Phadke: साखळदंडात बांधून ब्रिटिशांनी रस्त्यावर चालवले; सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक वासुदेव बळवंत फडकेंचा केला होता अतोनात छळ

IND vs AUS 3rd T20I : भारताने केला विक्रमी लक्ष्याचा यशस्वी पाठलाग, ऑस्टेलियाला नमवून मालिका बरोबरीत; अर्शदीप, सुंदर ठरले लकी

SCROLL FOR NEXT