Mamata-Banerjee 
देश

पेगॅसस हेरगिरी प्रकरणी 'ममता' आक्रमक; तपासासाठी आयोगाची स्थापना

विनायक होगाडे

कोलकाता : पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून देशातील विरोधी पक्षातले राजकारणी तसेच पत्रकारांवर पाळत ठेवण्यात आल्याच्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या पाळत प्रकरणावरुन केंद्र सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात असून अद्याप याबाबतचं समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आलं नाहीये. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सध्या हा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. या दरम्यानच आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एका आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली आहे.

निवृत्त न्यायाधीश असतील आयोगाचे सदस्य

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मंत्रीमंडळाची एक विशेष बैठक झाली. या बैठकीत हा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आयोगाचे सदस्य निवृत्त न्यायाधीश असतील, असं देखील ठरवण्यात आलं आहे. दोन सदस्यीय आयोगाचे अध्यक्षपद कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ज्योतिर्मय भट्टाचार्य भुषवतील. उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन भीमराव लोकूर या आयोगाचे दुसरे सदस्य आहेत.

केंद्र सरकारवर सडकून टीका

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यामध्ये पत्रकार परिषदेत म्हटलं की, आम्हाला वाटलं होतं की, फोन हॅकींग प्रकरणी तपासासाठी केंद्राकडून एखादा आयोग स्थापन केला जाईल अथवा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपासाचा आदेश दिला जाईल. मात्र, सरकार या प्रकरणी काहीच पाऊल उचलत नाहीये. म्हणूनच, या पेगॅसस पाळत प्रकरणी तपासासाठी आयोग स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की, पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून ज्या लोकांवर पाळत ठेवण्यात आलीय, त्यामध्ये पश्चिम बंगालच्या देखील काही नावांचा समावेश आहे. केंद्र सरकार हेरगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. हा स्थापन केलेला आयोग अवैधरित्या फोन हॅक करण्याच्या या प्रकरणाचा पूर्णपणे तपास करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT