narendra modi mamta  sakalmedia
देश

''भारताची आर्थिक स्थिती श्रीलंकेपेक्षाही वाईट, ममतांचा केंद्राला सल्ला''

यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीवरून केंद्रावर हल्लाबोल केला.

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता : भारताची आर्थिक स्थिती श्रीलंकेपेक्षाही (Sri Lanka) वाईट असल्याचे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी व्यक्त केले आहे. तसेच या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्यांनी केंद्राला सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचे आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीवरून केंद्रावर हल्लाबोल केला. (Mamata Banerjee On Indian Economy Crises)

बॅनर्जी म्हणाल्या की, भारताची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. श्रीलंकेतील लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तेथील आर्थिक परिस्थिती बिकट आहे. तर भारताची आर्थिक स्थिती त्याहून बिकट आहे.

मात्र, आपण भारताची तुलना श्रीलंकेशी करत नसल्याचे स्पष्ट करत बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्रीय एजन्सी वापरण्याऐवजी आणि लोकशाहीवर जबरदस्तीने नियंत्रण ठेवण्याऐवजी, या संकटावर मात कशी करता येईल यावर उपाय शोधण्यासाठी केंद्राने सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे.

सीएम बॅनर्जींचा सरकारविरोधात मोर्चा

मार्चमध्ये, बॅनर्जी यांनी बिगर-भाजप मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांना पत्र लिहून बैठक बोलावली होती. यामध्ये त्यांनी देशभरातील राजकीय विरोधकांविरोधात भाजप केंद्रीय यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप केला होता. तसेच अनेक मुख्यमंत्री तक्रार करत आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची राज्यांच्या राज्यपालांशी समस्या आहे. यासाठी सर्व राज्यांनी एकत्र यावे असे त्या म्हणाल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kohlapur Tragedy: जनावरांसाठी घेतली धाव अन् आयुष्याचा उधळला डाव; निकमवाडीतील तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू

Supreme Court Maintenance Ruling : पत्नीचे परपुरूषाशी संबंध, पतीकडून पोटगी मिळवण्याचा अधिकार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Talathi Recruitment Fraud: बनावट गुणपत्रिकेवर नोकरी, चार तलाठ्यांना दोन वर्षांची शिक्षा, १९ हजार दंड: बनावट गुणपत्रिकेवर नोकरी, चार तलाठ्यांना दोन वर्षांची शिक्षा, १९ हजार दंड

Latest Marathi News Live Update : शिवमोग्गा जिल्ह्यातील तीर्थहल्लीमध्ये घरावर दरड कोसळली, एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू

3 वर्षात ६२ अब्जांहून जास्त नोटा चलनातून रद्द, फाटलेल्या अन् खराब नोटांनी मोठा फटका

SCROLL FOR NEXT